-
अलीकडेच ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’ जाहीर झाली आहे. या यादीत भारतातील ३०० हून अधिक अब्जाधीशांचा समावेश आहे. मनोरंजन क्षेत्रातील ५ सेलिब्रिटींनीही या यादीत स्थान मिळवले आहे.
-
या यादीत अभिनेता शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर आहे. तर अभिनेत्री जुही चावला दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
बॉलीवूड सेलिब्रिटींच्या या यादीत अभिनेत्री जुही चावलाचे नाव जरी दुसऱ्या क्रमांकावर असले तरी सध्या ती देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
-
अभिनेत्री जुही चावला १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’ या यादीत जुही चावला आणि तिच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ४६०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
-
अभिनेत्री जुही चावला आणि पती जय मेहता हे शाहरुख खानसह आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे सह-मालक आहेत.
-
याशिवाय जुही चावलाचे शाहरुख खानच्या फिल्म प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमध्येही भागीदार आहे.
-
जुही चावला रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि कोलकता नाइट रायडर्स क्रिकेट फ्रँचायझीमधून आपल्या गुंतवणुकीतून कोटींची कमाई करते.
-
(फोटो स्त्रोत: जुही चावला/इन्स्टाग्राम)
दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा नव्हे तर ९०च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रीचं नाव सर्वात श्रीमंत नायिकांच्या यादीत अव्वल; पाहा फोटो
नुकतीच ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’ जाहीर झाली आहे. या यादीत ९०च्या दशकातील एका अभिनेत्रीचं नाव सर्वात श्रीमंत नायिकांच्या यादीत अव्वल स्थानकावर आहे.
Web Title: Deepika padukone not priyanka chopra this actress of the 90s tops the list of richest heroines see photos arg 02