-
अनेकदा सोशल मीडियावर बॉलीवूड सेलिब्रिटींच्या डेटिंगच्या अफवा पसरतात. प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींचे चाहते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. आज आपण अशा सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी परदेशी व्यक्तीशी लग्न केले आहे.
-
अभिनेत्री तापसी पन्नूने आजवर अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासह बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांसह स्क्रीन शेअर केली आहे.
-
तापसीने मार्च २०२४ मध्ये डॅनिश बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक मॅथियास बोईसोबत लग्न केले. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची पुष्टी केलेली नाही परंतु त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ लीक झाला आहे.
-
बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित टीव्हीवर अनेक डान्स रिॲलिटी शोमध्ये दिसते. तिच्या लूक्स, चित्रपट, नृत्य, अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाचे अनेक चाहते आहेत.
-
माधुरीने १९९९ मध्ये अमेरिकन सर्जन श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले ज्यांचे पालक भारतीय आहेत.
-
सुचित्रा ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि निर्माती आहे. तिने डॅनिश अभियंता लार्स केल्डसेनशी लग्नगाठ बांधली. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाल्यानंतर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. या जोडप्याने २००५ मध्ये लग्न केले.
-
प्रीती ही ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत. प्रीती अनेकदा क्रिकेट खेळाचा आनंद घेताना दिसली आहे.
-
प्रीती झिंटाने २०१६ मध्ये अमेरिकन आर्थिक विश्लेषक जीन गुडइनफसोबत लॉस एंजेलिसमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले.
-
सनीने तिच्या गोड, निरागस आणि गोंडस व्यक्तिमत्वाने अनेकांची मने जिंकली आहेत. अनेक लोकप्रिय चित्रपट आणि गाण्यांमध्ये ती दिसली आहे.
-
तसेच, तिचे ‘लैला में लैला’ हे आयटम साँग खूपच लोकप्रिय झाले होते. सनीने २०११ मध्ये अमेरिकन अभिनेता आणि निर्माता डॅनियल वेबरसोबत लग्न केले.
-
अभिनेत्री सेलिना ‘नो एंट्री’सह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसली होती. तिचे लग्न ऑस्ट्रियन हॉटेलियर आणि उद्योजक पीटर हागशी झाले. या जोडप्याने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच वेगवेगळ्या पात्रांसह पडद्यावर दिसली आहे. अक्षय कुमार आणि मनोज त्रिपाठी यांसारख्या अनेक बड्या कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे.
-
राधिकाने २०१२ मध्ये बेनेडिक्ट टेलर नावाच्या ब्रिटीश संगीतकाराशी लग्न केले. त्याने अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
-
प्रियांका चोप्रा ही तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रतिभेमुळे भारतात आणि जगभरात ओळखली जाते. तिने तिच्या चित्रपटातून लाखो मने जिंकली आहेत. प्रियांकाने २०१८ मध्ये लोकप्रिय अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनास याच्याशी हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीमध्ये लग्न केले.
-
Bigg Boss: राखी सावंत ते निक्की तांबोळी, ‘या’ मराठमोळ्या कलाकारांनी गाजवले बिग बॉस हिंदीचे पर्व; तुमचा आवडता स्पर्धक कोणता?
Photos: ‘या’ लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रींचा फॉरेनरवर जडला जीव; लव्हस्टोरीही आहे अतिशय खास
आज आपण अशा सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी परदेशी व्यक्तीशी लग्न केले आहे.
Web Title: These popular bollywood actress married a foreigner the love story is also very special pvp