• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi season 5 arya jadhao fans support her after putting nikki tamboli in slap pps

Photos: “बिग बॉस फेयर खेळा”, म्हणत आर्याच्या समर्थनार्थ उतरले चाहते, म्हणाले, “निक्कीला जिंकवण्यााठीच…”

Bigg Boss Marathi Season 5 : आर्याचे चाहते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

Updated: September 14, 2024 18:36 IST
Follow Us
  • Bigg Boss Marathi Season 5 Vishakha Subhedar Share old memories of pandharinath kam
    1/12

    ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू आहे. नुकताच सातवा आठवडा पार पडला.

  • 2/12

    सातव्या आठवड्यात ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात बरेच राडे झाले. पण आठवड्याच्या शेवटी एक घटना घडली; ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होतं आहे.

  • 3/12

    कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान निक्की तांबोळी व आर्या जाधवमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली.

  • 4/12

    या घटनेनंतर ‘बिग बॉस’ने आर्याला तात्पुर्ती शिक्षा दिली. तिला जेलमध्ये टाकलं. पण आता भाऊच्या धक्क्यावर आर्याला कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. असं असलं तरी आर्याचे चाहते तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

  • 5/12

    सोशल मीडियावर आर्याच्या समर्थनार्थ चाहत्यांच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

  • 6/12

    या पोस्टमध्ये आर्याच्या चाहत्याने लिहिलं आहे की, निक्कीने आर्याला एका टास्कमध्ये धक्का मारला, कपडे फाडले पण ‘बिग बॉस’ने निक्कीला काहीच केलं नाही. पण आर्याला जर ‘बिग बॉस’ने घराबाहेर काढलं तर बिग बॉसचा प्लॅन एक्स्पोज होईल की निक्कीला विजयी करायचं आहे. बिग बॉस फेयर खेळा. सर्व सदस्यांबरोबर समान राहा.”

  • 7/12

    आर्याच्या दुसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे, “जेव्हा निक्की आर्याला धक्काबुकी करते, नख मारते तेव्हा तर काय ‘बिग बॉस’ कारवाई नाही करत. हा खेळ आहे आणि खेळताना लागत. जर ही निक्की एवढी नाजूक आहे तर घरी बस ना बाई कशाला शोमध्ये येते. आमचा आर्याला पाठिंबा आहे.”

  • 8/12

    तसंच आर्याच्या तिसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे की, “निक्कीने किती वेळा तरी कानाखाली मारण्याची अॅक्शन केली आहे आणि आर्याचे कपडे सुद्धा फाडले आहेत. मी तर बोलते आर्याने कानाखालीबरोबर दोन लाथा मारायला हव्या होत्या आणि त्याच्याबरोबर अरबाज, वैभवला पण वाजवायला हवी होती. तेवढंच मनाचं समाधान झालं असं.”

  • 9/12

    “आर्या थँक्यू सो मच. तू निक्कीला कानाखाली वाजवून खूप छान केलं. जर तुला ‘बिग बॉस’ने बाहेर काढलं तर ते फेयर होणार नाही. तुला काही नाही होणार. तुला वाचवायला आम्ही आहोत. तसंच निक्की तुला धक्का देत होती आणि तरी मी बोलते, मी कॉम्लेमेंट करत नाही. मग आता का करते ती पांचट निक्की. ‘बिग बॉस’ प्लीज निक्कीला बाहेर काढा. महाराष्ट्राला ती निक्की आवडत नाही. मी रील्स, व्हिडीओमध्ये कमेंट्स बघू सांगतो,” असं आर्याच्या चाहत्याने लिहिलं आहे.

  • 10/12

    तसंच आर्याच्या एका चाहत्याने खरं फुटेज दाखवण्याची मागणी केली आहे. ‘बिग बॉस’ खरं फुटेज दाखवा नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला वाटेल की, शो स्क्रिप्टेड आहे.

  • 11/12

    याशिवाय आर्याच्या एका चाहत्याने लिहिलं आहे, “या आठवड्यात जर रितेश भाऊंनी निक्कीला शिक्षा नाही केली आणि तिला जर जेलमध्ये नाही टाकलं तर समजायचं ‘बिग बॉस’चा प्रयत्न फक्त निक्काला जिंकवण्यााठीच चालू आहे. कारण तिचीच मनमानी चालू आहे. इतका अट्टाहास करण्यापेक्षा तिला ट्रॉफी देऊन संपून टाका…लोकांचा तरी वेळ कशाला वाया घालवताय.”

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य – कलर्स मराठी आणि आर्या जाधव इन्स्टाग्राम

TOPICS
बिग बॉस मराठीBigg Boss MarathiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi season 5 arya jadhao fans support her after putting nikki tamboli in slap pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.