• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mumbai actress kadambari jethwani arrest 40 days in andhra pradesh three ips officer suspended for harassing her know who is she kvg

Actress Kadambari Jethwani: मुंबईच्या अभिनेत्रीचा ४० दिवस छळ; ३ IPS अधिकारी निलंबित, तिच्याबरोबर काय घडलं?

Who is model-actress Kadambari Jethwani: मुंबईस्थित अभिनेत्री कादंबरी जेठवानीला आंध्रप्रदेश पोलिसांनी अवैधरित्या ४० दिवस पोलीस कोठडीत डांबून तिचा छळ केला. याप्रकरणी आता तीन आयपीएस अधिकाऱ्यांना आंध्रप्रदेश सरकारने निलंबित केलं आहे. (सर्व फोटो – Kadambari Jethwani Instagram)

September 18, 2024 11:34 IST
Follow Us
  • Kadambari Jethwani news Update
    1/11

    मुंबईस्थित असलेली अभिनेत्री कादंबरी जेठवानी सध्या एका प्रकरणामुळं चर्चेत आहे. तिची अवैध अटक केल्यामुळं आंध्रप्रदेश सरकारनं तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे.

  • 2/11

    आंध्रतील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसशी संबंधित एक नेता आणि चित्रपट निर्मात्याने कादंबरी जेठवानीच्या विरोधात फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. आंध्रा पोलिसांनी यानंतर कादंबरी आणि तिच्या कुटुंबियांचा छळ केल्याचा आरोप अभिनेत्रीनं केला आहे.

  • 3/11

    ऑगस्ट महिन्यात कादंबरीच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला मुंबईहून विजयवाडा येथे आणलं आणि तब्बल ४० दिवस कोठडीत ठेवलं. तसंच कादंबरीच्या वयोवृद्ध पालकांनाही वाईट वागणूक दिल्याचा आरोप अभिनेत्रीनं केला आहे.

  • 4/11

    पोलिसांनी कोणताही तपास न करता माझा आणि कुटुंबियांचा तब्बल ४० दिवस मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप अभिनेत्रीने एनटीआर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त एस. व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे तक्रारीद्वारे केला.

  • 5/11

    तत्पूर्वी आपण निर्मात्याविरोधात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळेच निर्माता आणि आंध्रप्रदेशच्या पोलिसांनी आपल्याविरोधात षडयंत्र रचलं, असाही आरोप अभिनेत्रीनं केला.

  • 6/11

    अभिनेत्री कादंबरी आणि तिच्या कुटुंबियांना चुकीच्या प्रकरणात गोवल्यामुळं आणि बोगस कागदपत्र तयार केल्या प्रकरणी आंध्रप्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

  • 7/11

    आंध्रप्रदेशचे गुप्तवार्ता विभागाचे माजी प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू, विजयवाडाचे माजी पोलीस आयुक्त क्रांती राना टाटा, माजी पोलीस उपायुक्त विशाल गुन्नी या तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर अभिनेत्रीचा छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

  • 8/11

    आयएमडीबी संकेतस्थळावरील माहितीनुसार, कादंबरी जेठवानी ही २८ वर्षीय अभिनेत्रीचे शिक्षण अहमदाबाद येथे झालं. त्यानंतर ती पालकांसह मुंबईत स्थायिक झाली.

  • 9/11

    कादंबरीने आतापर्यंत हिंदी, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटात अभिनय केलेला आहे. यातील अनेक चित्रपट गाजलेले आहेत.

  • 10/11

    काही महिन्यांपूर्वी आलेल्या प्रदर्शित झालेला मुसाफिरा या मराठी सिनेमाच्या निर्मितीत कादंबरी जेठवानीचाही सहभाग असल्याचं समोर आलं होतं. मुसाफिराच्या टीमसह एक फोटोही तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

  • 11/11

    आंध्रप्रदेशच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी हे प्रकरण सरकारने गांभीर्यानं घेतलं असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सरकार दोषींवर कारवाई करेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

TOPICS
आंध्रप्रदेशAndhra Pradeshआयपीएस अधिकारीIPS Officerक्राईम न्यूजCrime Newsबॉलिवूड न्यूजBollywood News

Web Title: Mumbai actress kadambari jethwani arrest 40 days in andhra pradesh three ips officer suspended for harassing her know who is she kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.