-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या टीव्ही शोचे सर्व कलाकार सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत, शिवाली परबही सध्या तिथे असून तिने तेथील न्यूयॉर्क शहरातील काही खास छायाचित्रांना तिच्या सोशल मीडियावरून शेअर केले आहे.
-
न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध ब्रूकलिन ब्रिजवर शिवालीने ही खास पोज दिली.
-
यावेळी शिवाली खूपच सुंदर दिसत होती.
-
या फोटोंना शिवालीने “ले चलो अपनी दुनिया में” असं खास कॅप्शनही दिलंय.
-
शिवालीचे हे फोटो तिच्या चाहत्यांनाही खूप आवडले आहेत.
-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली.
-
तिने आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
तिच्या हास्याच्या अचूक टायमिंगने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने शिवालीला मोठा चाहतावर्ग मिळवून दिला.
-
(सर्व फोटो साभार- शिवाली परब इन्स्टाग्राम पेज)
Photos : कल्याणची चुलबुली शिवाली परब पोहोचली न्यूयॉर्कमध्ये, “ले चलो अपनी..” दिलं खास कॅप्शन
Shivali Parab New York City Photos : कल्याणची चुलबुली शिवाली परब सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. तिने तेथील ट्रिपचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
Web Title: Maharashtrachi hasya jatra comedy tv show actress shivali parab visited brooklyn bridge in new york city usa spl