• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tmkoc sonu bhide aka palak sindhwani and these taarak mehta ka ooltah chashmah actors allegations on makers spl

TMKOC: पलक सिधवानीआधी, ‘या’ स्टार्सनीही निर्मात्यांवर शोषण आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत

TMKOC Sonu Bhide Last Day: तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही शोमध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणाऱ्या पलक सिधवानीने निर्मात्यांवर छळवणूक आणि थकबाकी न दिल्याचाआरोप करत शो सोडला आहे. तिच्यापुर्वी अनेक स्टार्सनी असित मोदींवर आरोप केले आहेत.

October 3, 2024 17:21 IST
Follow Us
  • Palak Sindhwani
    1/9

    TMKOC Sonu Bhide Last Day: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोमध्ये ‘सोनू भिडे’ची भूमिका साकारणारी पलक सिधवानी सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने निर्मात्यांवर अनेक आरोप केले आहेत. (Photo: Palak Sindhwani/Insta)

  • 2/9

    पलक सिधवानीने तारक मेहताच्या उल्टा चष्माच्या प्रोडक्शन टीमवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. (Photo: Palak Sindhwani/Insta)

  • 3/9

    छळवणूक आणि फी न भरल्याचा आरोप
    पलक सिधवानीने या शोच्या निर्मात्यांवर तिचा मानसिक छळ केल्याचा आणि करार मोडण्यासाठी चुकीची कायदेशीर नोटीस पाठवल्याचा आरोप केला आहे. शोच्या निर्मात्यांनी २१ लाखांचे उर्वरित पेमेंट न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याशिवाय पलक सिधवानीने आरोप केला आहे की तिची तब्येत खराब असूनही निर्मात्यांनी तिला शोच्या शूटिंगसाठी बोलावले होते. (Photo: Palak Sindhwani/Insta)

  • 4/9

    असित मोदींसाठी हे काही नवीन नाही
    तारक मेहता का उल्टा चष्मा छळ आणि पैसे न दिल्याने चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. शोचे निर्माते असित मोदी यांच्यासाठी हे काहीच नाही. याआधीही शो मधील अनेक कलाकारांनी छळ आणि पैसे न दिल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. (Photo: Asit Kumarr Modi/Insta)

  • 5/9

    एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप
    तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये शैलेश लोढा यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. शैलेश लोढा यांनीही शो सोडताना असित मोदी यांच्यावर गैरवर्तन आणि पैसे न दिल्याचा आरोप केला होता. शैलेश यांनी नॅशनल लॉ कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये थकबाकी न दिल्याबद्दल आरोप दाखल केला होता, त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये समझोता करार झाला आणि असित मोदी यांना एक कोटी रुपये देण्याचे सांगण्यात आले होते. (Photo: Shailesh Lodha/Twitter)

  • 6/9

    लैंगिक शोषणाचा आरोप
    जेनिफर मिस्त्रीने असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. जेनिफरने असित मोदी आणि त्यांच्या टीममधील काही जणांवर गैरवर्तनाचा आरोप करत पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसताना त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली. यानंतर असित मोदी दोषी आढळले आणि त्यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यासोबतच जेनिफर मिस्त्रीची थकबाकी चुकवण्याचे आदेशही देण्यात आले होते. (Photo: Jennifer Mistry Bansiwal/Insta)

  • 7/9

    गंभीर आरोप
    मोनिका भदोरिया यांनी असित मोदींवर करिअर बरबाद करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. मोनिका भदौरियाने सांगितले होते की, सेटवर तिला कुत्र्यासारखे वागवले जात होते. यामुळे तिने अनेकदा आत्महत्येचा विचारही केला होता. (Photo: Monika Sushma Bhadoriya/Insta)

  • 8/9

    प्रिया आहुजा
    या शोमध्ये प्रिया आहुजाने रिटा रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. अभिनेत्रीने आरोप केला होता की तिचा पती मालव राजदाने शो सोडल्यानंतर निर्मात्यांनी तिचा ट्रॅक पूर्णपणे संपवला होता. आतिस मोदी तिला म्हणायचे की जर तिचा नवरा कमावत असेल तर तिला काम करण्याची काय गरज आहे. (Photo: Priya Ahuja Rajda/Insta)

  • 9/9

    हेही वाचा- Navratri 2024 : यंदा नवरात्रीत गरबा खेळताना बॉलीवूडची ‘ही’ खास गाणी लावा, पाहा यादी… 

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tmkoc sonu bhide aka palak sindhwani and these taarak mehta ka ooltah chashmah actors allegations on makers spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.