-
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्यच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. तिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या बेबी शॉवरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. (Photo Source: @sarya12/instagram)
-
कुंडली भाग्य या लोकप्रिय मालिकेत ‘डॉ. ‘प्रीता’च्या भूमिकेत दिसणारी श्रद्धा लग्नाच्या तब्बल तीन वर्षांनी आई होणार आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
दरम्यान, श्रद्धा आर्यने १६ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीचे नौदल अधिकारी राहुल नागल यांच्याबरोबर लग्न केले. आता दोघेही पालक होणार आहेत. (Photo Source: @sarya12/instagram)
-
श्रद्धाने तिच्या बेबी शॉवरचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा आनंद आणि प्रेग्नंसीची चमक तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
या बेबी शॉवर फोटोंमध्ये, अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे, जे पाहून चाहते तिला खूप शुभेच्छा देत आहेत. (Photo Source: @sarya12/instagram)
-
या फोटोंमध्ये श्रद्धा आर्यने गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. या फंक्शनसाठी तिने गोल्डन मोटीफ वर्क असलेली साडी निवडली आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
भारी जरी वर्क असलेल्या ब्लाउजसोबत तिने ही साडी पेअर केली आहे. ‘जरीएरा’ या कपड्यांच्या ऑनलाइन शॉपवर या साडीची किंमत ४८ हजार रुपये सांगण्यात आली आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
साडीसोबतच या अभिनेत्रीने चकचकीत मेकअप, मोकळे केस आणि जड दागिन्यांनी तिचे सौंदर्य वाढवले आहे. (Photo Source: @sarya12/instagram)
-
दुसरीकडे, तिचा नवरा राहुल यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता, जो त्याने नेहरू जॅकेटसोबत पेअर केला होता. (Photo Source: @sarya12/instagram)
-
बेबी शॉवरपूर्वी, श्रद्धाने तिच्या पतीसोबत केक कापला आणि तिच्या मित्रांसोबत डान्सही केला. अभिनेत्रीने तिच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबियांमध्ये तिचा बेबी शॉवर साजरा केला. (Photo Source: @sarya12/instagram)
हेही वाचा- Singham Again साठी अजय देवगणने घेतले ३५ कोटी, अर्जुन कपूर, टायगर, दीपिका, करीनाला कित…
‘कुंडली भाग्य’ मधील प्रीता आई होणार, पाहा श्रद्धा आर्याच्या बेबी शॉवरचे खास Photos
Shraddha Arya Baby Shower: श्रद्धा आणि तिचा पती राहुल नागल यांच्या घरात लहान अतिथीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी काल एका भव्य बेबी शॉवर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
Web Title: Kundali bhagya fame shraddha arya hosted grand baby shower with husband rahul spl