-   Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: रविवारी, ०६ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा दिमाखात पार पडला. 
-  घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पद्धतीने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली होती. 
-  ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक होती. 
-  अंकिता वालावलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 
-  सध्या चाहत्यांमध्ये अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची चर्चा सुरू आहे. 
-  काही महिन्यांपूर्वीच अंकिताने एका मुलाबरोबर तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. तोच अंकिताचा होणारा नवरा असल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतेय. 
-  अंकिताने हा फोटो शेअर करत ‘Trust Me, We Will Recreate This In Future’ असे कॅप्शन दिले आहे. 
-  सोशल मीडियावर असलेल्या माहितीनुसार अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव कुणाल भगत (Kunal Bhagat) असे आहे. 
-  कुणाल हा एक संगीत दिग्दर्शक (Music Director) आहे. 
-  कुणालने आतापर्यंत अनेक गाण्यांचे व चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. 
-  कुणालला अंकिताचे चाहते ‘कोकण हार्टेड बॉय’ (Kokan Hearted Boy) या नावाने हाक मारत आहेत. 
-  (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम) 
-  (हेही पाहा : मराठी अभिनेत्रींचा निळ्या रंगाच्या साडीतील खास अंदाज) 
Photos: ‘बिग बॉस’ फेम अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ; ‘या’ संगीत दिग्दर्शकाच्या प्रेमात?
सध्या चाहत्यांमध्ये अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची चर्चा सुरू आहे.
Web Title: Bigg boss marathi season 5 fame ankita walawalkar dating kunal bhagat rumours on social media photos sdn