Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. character played in 3 idiots had put ali fazal into depression after emerging from it he created stir in hollywood bollywood and ott spl

‘या’ चित्रपटानंतर अली फजल गेला होता नैराश्यात; स्वतःला सावरुन पोहोचला हॉलीवूडपर्यंत आता OTT चाही बनला किंग!

Ali Fazal Birthday: अली फजल हा भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील एक असा स्टार आहे ज्याने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे.

Updated: October 15, 2024 16:37 IST
Follow Us
  • 3 Idiots Joy Lobo Character
    1/10

    अली फजल आज भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली आहे. मेहनत, ध्यास आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांने खूप पुढे मजल मारली आहे. (Photo Source: @alifazal9/instagram)

  • 2/10

    अली फजल आज १५ ऑक्टोबर रोजी ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, आपण त्याच्या कारकिर्दीच्या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकू, या प्रवासाने त्याला एका सामान्य अभिनेत्यापासून आंतरराष्ट्रीय स्टार बनवले. (Photo Source: @alifazal9/instagram)

  • 3/10

    अली फजलची अभिनय कारकीर्द २००८ मध्ये ‘द अदर एंड ऑफ द लाइन’ या इंग्रजी चित्रपटाने सुरू झाली, ज्यामध्ये त्याने छोटीशी भूमिका केली होती. मात्र, त्याला खरी ओळख २००९ मध्ये आलेल्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातून मिळाली. (Photo Source: @alifazal9/instagram)

  • 4/10

    या चित्रपटात त्याने जोई लोबो या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती जो अभ्यासाच्या दबावाखाली आत्महत्या करतो. त्याची व्यक्तिरेखा लहान असूनही त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. पण तुम्हाला माहित आहे का की हे पात्र अलीसाठी खूप आव्हानात्मक होते. (Photo Source: @alifazal9/instagram)

  • 5/10

    ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर अली फजलला नैराश्याचा सामना करावा लागला. त्याने खुलासा केला की ३ इडियट्समध्ये त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेमुळे मीडिया त्याला तेच प्रश्न विचारत होता, ज्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. (Photo Source: @alifazal9/instagram)

  • 6/10

    अलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी देखील त्यावेळी एक विद्यार्थी होतो आणि या प्रश्नांनी उद्ध्वस्त झालो होतो.” यानंतर राजकुमार हिरानी यांनी या प्रश्नांना गांभीर्याने घेऊ नको आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. (Photo Source: @alifazal9/instagram)

  • 7/10

    यानंतर अली फजलच्या करिअरला खऱ्या अर्थाने २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘फुक्रे’ या चित्रपटातून उभारी मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेली जफरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्याच्या कॉमिक टाइमिंग आणि नैसर्गिक अभिनयाने त्याला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून स्थापित केले. (Photo Source: @alifazal9/instagram)

  • 8/10

    ‘फुक्रे’च्या यशाने अलीला बॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. यानंतर त्याने ‘बॉबी जासूस’, ‘खामोशियां’, ‘हॅपी भाग जायेगी’ सारख्या चित्रपटांमध्येही चमकदार काम केले. बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर अली फजल हॉलिवूडकडेही वळला. (Photo Source: @alifazal9/instagram)

  • 9/10

    ‘फास्ट अँड फ्युरियस’ मालिकेच्या सातव्या भागात महत्त्वाची भूमिका साकारून त्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. याशिवाय अलीचा ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ हा चित्रपटही खूप गाजला होता. (Photo Source: @alifazal9/instagram)

  • 10/10

    त्याच वेळी, अली फजलने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये गुड्डू भैयाची भूमिका साकारून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली छाप पाडली. या व्यक्तिरेखेतील त्याचा दमदार अभिनय आणि पडद्यावरच्या उपस्थितीमुळे तो OTT जगातही एक स्टार बनला. मिर्झापूरच्या यशानंतर अलीची लोकप्रियता आणखी वाढली आणि त्याने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. (Photo Source: @alifazal9/instagram)
    हेही वाचा – “ॲटिट्यूड तो ऐसे…”, श्रद्धा कपूरच्या नव्या फोटोंवरील कॅप्शनने वेधलं लक्ष, पाहा ग्लॅमरस Photos

TOPICS
अली फझलAli FazalबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Character played in 3 idiots had put ali fazal into depression after emerging from it he created stir in hollywood bollywood and ott spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.