-
मुंबईत हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकरचं अलीकडेच हे स्वप्न साकार झालं आहे.
-
अक्षय केळकर करिअर घडवण्यासाठी मुंबईत आल्यावर सुरुवातीला आपल्या मित्रांसह ८ वर्षे भाड्याच्या घरात राहिला.
-
अक्षयने त्याचवेळी मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
-
गेल्यावर्षी म्हाडाच्या सोडतीत अर्ज भरून अक्षयला त्याचं हक्काचं घर मिळालं.
-
आपल्या पहिल्या घराचं इंटिरिअर करण्यासाठी या अभिनेत्याने खूपच मेहनत घेतली आहे.
-
संपूर्ण घराला अक्षयने मराठमोळा, पारंपरिक टच दिला आहे.
-
अभिनेत्याने घरातील एका कोपऱ्यात ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यावरची ट्रॉफी आणि काही वस्तू ठेवण्यासाठी विशेष जागा तयारी केली आहे.
-
अक्षय केळकरच्या घरात पाऊल ठेवल्यावर विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन, मराठमोळी सजावट, प्रशस्त हॉल या सगळ्या गोष्टी लक्ष वेधून घेतात.
-
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने घराचं हे स्वप्न पूर्ण झाल्याचं अक्षय केळकर आवर्जून सांगतो. ( सर्व फोटो सौजन्य : अक्षय केळकर युट्यूब चॅनेल )
८ वर्षे भाड्याच्या घरात राहिल्यावर अखेर स्वप्न झालं पूर्ण! मराठमोळ्या अभिनेत्याने ‘असं’ सजवलं हक्काचं पहिलं घर, पाहा Photos
मराठी अभिनेत्याने ‘असं’ सजवलंय नवीन घर, इंटिरिअरचं सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
Web Title: Marathi actor akshay kelkar new house traditional maharashtrian look interior see photos sva 00