-
सुप्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीने सोशल मीडियावर प्रसिद्ध स्टायलिस्ट रोहित बल यांच्या आठवणीत सोशल मीडियावर खास लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.
-
कियाराने तिच्या करिअरच्या प्रवासाची सुरुवात फुगली या चित्रपटातून केली आणि एम. एस. धोनी या चित्रपटातून ती प्रसिद्धीझोतात आली.
-
त्यानंतर गुड न्यूज, कबीर सिंग, लस्ट स्टोरीज, भूल भुलैया २ यांसारख्या अनेक चित्रपटांनी तिला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.
-
कियाराने पांढऱ्या रंगाचा गुलाबाच्या फुलांची प्रिंट असलेला स्लीव्हलेस गाऊन परिधान केला आहे.
-
लूक आकर्षक होण्यासाठी कियाराने गळ्यात चोकर आणि हातात सोनेरी बांगड्यांसह कडे घातले आहे.
-
या फोटोमध्ये कियाराने गुलाबाचे फूल हातात धरून पोज दिली आहे.
-
या फोटोमध्ये किनारा गुलाबाच्या पाकळ्या जणू तिच्या चाहत्यांसाठी उडवत आहे, असे वाटते.
-
डोळ्यातील काजळ व आयलायनरने कियाराच्या या खास लूकला अधिक सौंदर्य प्राप्त झाले आहे.
-
कियाराच्या लूकवर चाहत्यांनी कियाराच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
(सर्व फोटो सौजन्य; कियारा अडवाणी / इंस्टाग्राम)
Photos: कियारा अडवाणीचा गुलाबी ड्रेसमधील हा लूक व्हायरल , रोहित बल यांच्या आठवणीत ही खास पोस्ट
कियाराचा हा अनोखा लूक आणि यातील पोज प्रेक्षांकाच्या प्रेमापोटी असल्याचे दिसून येते
Web Title: Kiara advani rose dress outfit booms social media post viral pyd 04