-
आजवर अनेक मालिकांमध्ये आपण सुरेखा कुडची यांना खलनायिकेच्या रुपात पाहिलं आहे. याशिवाय त्यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सुद्धा सहभाग घेतला होता.
-
अभिनेत्रीला महाराष्ट्रातील घराघरांत ओळखलं जातं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर सुरेखा यांना एकुलती एक लेक आहे.
-
सुरेखा यांच्या लेकीचं नाव जान्हवी उदळे असं आहे.
-
“जान्हवी म्हणजेच गंगा…ज्या घरात गंगा असेल ते घर सतत समृद्ध असणार अगदी तसंच माझ्या लेकीने माझ्या पोटी जन्म घेऊन मला समृद्ध केलं.” असं सुरेखा कुडची यांनी मुलीच्या नावामागची गोष्ट सांगताना सांगितलं होतं.
-
लेकीबरोबरचे अनेक फोटो सुरेखा कुडची सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
सुरेखा यांच्या पतीचं नाव गिरीश उदळे. २०१३ मध्ये त्यांचं आकस्मिक निधन झालं. त्यानंतर सुरेखा यांनी आपल्या लेकीचा एकटीने सांभाळ केला.
-
सुरेखा यांची लेक पुण्यात तर, त्या कामानिमित्त मुंबईत असतात. या सगळ्या परिस्थितीशी जान्हवीने उत्तमपणे जुळवून घेतलंय असंही त्या सांगतात.
-
मला मुलगा नाही याची अजिबात खंत नाही उलट मला एकुलती एक मुलगी आहे याचा प्रचंड अभिमान आहे असं त्या नेहमी म्हणतात.
-
“मूल कितीही मोठं झालं तरी ते आईसाठी लहानच असतं” असं म्हणत सुरेखा यांनी लाडक्या लेकीला बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ( फोटो सौजन्य : सुरेखा कुडची इन्स्टाग्राम )
सुरेखा कुडची यांच्या लेकीला पाहिलंत का? नाव आहे खूपच खास; पतीच्या निधनानंतर एकटीनेच केला मुलीचा सांभाळ
सुरेखा कुडची यांनी लेकीबरोबरचे सुंदर फोटो शेअर करत दिल्या बालदिनाच्या शुभेच्छा, फोटो पाहिलेत का?
Web Title: Marathi actress surekha kudachi shares photos with daughter on the occasion of children day sva 00