-
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता राजनने सोशल मीडियावर तिच्या नव्या पात्राचा खास लूक शेअर केला आहे.
-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या लोकप्रिय मालिकेमध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. एका नवीन पात्राची एंट्री झाली असून या पत्राचे नाव अनुष्का आहे.
-
‘राजा राणीची गं जोडी’, ‘मन झालं बाजिंद’ यांसारख्या अनेक मालिकांमधून श्वेता राजन प्रसिद्धीझोतात आली आहे.
-
नुकतीच लोकांचा निरोप घेतलेली सन मराठी वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेमध्ये श्वेताने खलनायिकेचे काम केले होते.
-
या खास लूकसाठी श्वेताने निळ्या रंगाची प्रिंट असलेली साडी व त्यावर पांढऱ्या रंगाचा कोट परिधान केला आहे.
-
या लूकची शोभा वाढविते ते श्वेताची सरळ आणि सोपी केशरचना.
-
श्वेताने या फोटोमध्ये खुर्चीवर बसून ठळक पोज दिल्या आहेत.
-
श्वेताने सर्व फोटो झाडांनी सजवलेल्या बाल्कनीमध्ये काढले आहेत.
-
श्वेताच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी श्वेताला पारूमधील कामासाठी शाब्बासकीची थाप देत कौतुक केले आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; श्वेता राजन )