-
रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांचा Pushpa 2: the rule हा चित्रपट काल (५ डिसेंबर) प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात रश्मिका श्रीवल्लीची भूमिका साकारत आहे तर अल्लू अर्जुन पुष्पा राज हे पात्र साकारत आहे.
-
२०२१ मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या पुष्पा या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.
-
दरम्यान रश्मिकाने इन्स्टाग्रामवरून पुष्पाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दिग्दर्शक सुकुमार अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका दिसत आहेत.
-
सेटवरील मजा मस्ती आणि इमोशन्स रश्मिकाने या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
-
तिने फोटो कप्शन लिहिलं आहे की चित्रपटातील श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी तिने चित्तूर या भाषेचं प्रशिक्षण घेतलं होतं.
-
पुष्पा आणि पुष्पा २ या दोन चित्रपटांच्या पाच वर्षांच्या कालावधीबद्दल रश्मिका व्यक्त झाली आहे.
-
तिने दिग्दर्शक आणि सहकलाकारांचं कौतुक या पोस्टमधून केलं आहे.
-
पुष्पा टीमबरोबर खास नातं तयार झाल्याचं तिने म्हटलं आहे.
-
या पोस्टचा शेवट करताना तिने चित्रपट क्षेत्रात मेहनत प्रत्येक जण घेतो पण टीम चांगली असेल तर चांगलं काम होतं आणि प्रत्येकाच्या मेहनतीवर अनेक गोष्टींचं यश अवलंबून असतं. पुष्पाची टीम चांगली असल्याने चित्रपटाला यश मिळालं आहे, असं तिने नमूद केलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)
Photos : रश्मिका मंदानाने शेअर केले ‘Pushpa 2’ च्या सेटवरील BTS फोटो, कॅप्शनमध्ये श्रीवल्ली म्हणाली…
Pushpa 2 BTS : सेटवरील मजा मस्ती आणि इमोशन्स रश्मिकाने या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
Web Title: Pushpa 2 the rule actresss rashmika mandanna shared bts photos from the film set spl