• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 6 creepy terrifying horror web series on netflix in hindi that will keep you up at night spl

Netflix वर प्रचंड पाहिल्या जाणाऱ्या Top 6 हॉरर वेब सिरीज, झोप उडवणाऱ्या मालिका हिंदीमध्ये उपलब्ध

Top Horror Web Series: तुम्हाला या वीकेंडला काहीतरी धक्कादायक आणि भितीदायक पहायचे असेल, तर तुम्हाला नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवर या वेब सिरीज नक्की पाहता येतील. या टॉप ६ हॉरर वेब सिरीज तुमच्यासाठी योग्य आहेत.

December 8, 2024 13:23 IST
Follow Us
  • Netflix Hindi dubbed horror shows
    1/9

    जर तुम्हाला भयपटांची आवड असेल आणि रात्रीच्या वेळी भीतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर Netflix वर अशा अनेक वेब सीरिज आहेत ज्या तुमची रात्रीची झोप उडवू शकतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच ६ टॉप हॉरर वेब सीरिजबद्दल सांगत आहोत, ज्या पाहून तुम्हाला रात्री झोपताना भीती वाटेल. (Photo Source: Netflix)

  • 2/9

    The Haunting of Bly Manor
    या वेब सिरीजमध्ये एका केअरटेकरची कथा दाखवण्यात आली आहे, जो दोन मुलांच्या घरी जाऊन त्यांची काळजी घेतो. या ९ भागांच्या मालिकेतील धक्कादायक घटना आणि पछाडलेले वातावरण तुम्हाला घाबरवू शकते. तुम्ही ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहू शकता. (Photo Source: Netflix)

  • 3/9

    Guillermo del Toro’s Cabinet of Curiosities
    २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिरीजमध्ये ८ भीतीदायक आणि भयानक कथा दाखवण्यात आल्या आहेत. प्रत्येक भाग एका वेगळ्या भीतीदायक कथेवर आधारित आहे, जे पाहून तुम्ही भीतीने थरथर कापू शकता. ही सिरीज भयपट चाहत्यांसाठी एक परिपूर्ण पर्याय आहे. नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहता येईल. (Photo Source: Netflix)

  • 4/9

    Midnight Mass
    या वेब सिरीजने हॉरर जॉनरमध्ये एक नवीन संकल्पना आणली आहे. सिरीजचे सात भाग आहेत आणि यामध्ये एका बेटावर राहणाऱ्या १२७ लोकांची कथा आहे, ज्यांच्या आयुष्यात एक विचित्र वळण येते. तुम्हाला काहीतरी नवीन आणि वेगळे बघायचे असेल तर ही वेब सिरीज तुमच्यासाठी छान आहे. (Photo Source: Netflix)

  • 5/9

    Marianne
    ही वेब सिरीज २०१९ मध्ये रिलीज झाली होती. यामधील कथा एका प्रसिद्ध भयपट लेखकाची आहे, ज्याला भयानक घटनांचा सामना करावा लागतो. (Photo Source: Netflix)

  • 6/9

    या मालिकेत भीतीदायक दृश्यांची कमी नाही आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल. Netflix वर देखील पाहता येईल. (Photo Source: Netflix)

  • 7/9

    The Haunting of Hill House
    २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या वेब सिरीजमध्ये एका भयानक घटनांचा सामना करणाऱ्या कुटुंबाची रंजक कथा दाखवण्यात आली आहे. भूतकाळ आणि वर्तमानात अडकलेले हे कुटुंब विविध प्रकारच्या भीतीदायक आणि रहस्यमय अनुभवांमधून जात आहे. यामध्ये अनेक सीन्स आहेत जे पाहून तुम्ही थरथर कापालं. सिरीज Netflix वर उपलब्ध आहे, आणि हिंदीमध्ये देखील पाहता येते. (Photo Source: Netflix)

  • 8/9

    The Midnight Club
    ही वेब सिरीज तुम्हाला गोंधळात टाकेल. कथा एका पुनर्वसन केंद्राची आहे, जिथे काही रुग्ण मृत्यूच्या अगदी जवळ असतात. यामध्ये ८ तरुण आहेत. ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहू शकता. (Photo Source: Netflix)

  • 9/9

    हेही पाहा- एकेकाळी ‘या’ एव्हरग्रीन अभिनेत्रीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला, आता मात्र तिच्या सौंदर्याचे जगभर आहेत चाहते

TOPICS
नेटफ्लिक्सNetflixमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: 6 creepy terrifying horror web series on netflix in hindi that will keep you up at night spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.