-
Rohman Shawl Sushmita Sen Relationship: Rohman Shawl Sushmita Sen Relationship: बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल हे त्यांच्या नात्यामुळे बराच दिवस चर्चेत आहेत. मात्र, त्यांनी तीन वर्षांपूर्वी ब्रेकअपची घोषणा केली होती. मात्र, असे असूनही दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. (फोटो क्रेडिट: रोहमन शॉल/इन्स्टा)
-
आता रोहमनने तमिळ हिट चित्रपट ‘अमरन’ मधून पदार्पण केले आहे, ज्यामध्ये शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसले होते. अशा परिस्थितीत आता त्याने स्क्रीनशी खास संवाद साधताना सुश्मिता सेन आणि त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. त्याचं सुश्मिताच्य दोन्ही मुलींशी नातं कसं आहे, हेही त्याने सांगितलं. (फोटो क्रेडिट: रोहमन शॉल/इन्स्टा)
-
रोहमन म्हणाला, “मी खूप नशीबवान आहे, कारण लोक माझ्याबद्दल काय बोलतात किंवा काय विचार करतात याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. मला माझे सत्य माहीत आहे आणि मी स्वतःशी खूप प्रामाणिक आहे. लोकांना काय बोलायचंय तो त्यांचा निर्णय आहे.” (फोटो क्रेडिट: रोहमन शॉल/इन्स्टा)
-
पुढे तो म्हणाला, “लोक वाईट बोलतात किंवा काहीही बोलत असतील तरी मला फरक पडत नाही. मी माझ्याबद्दल काय विचार करतो आणि या क्षणी मी काय करत आहे हे महत्त्वाचे आहे. मी माझ्या आयुष्यात जे काही करतोय, त्याचा मला आदर आहे.” (फोटो क्रेडिट: रोहमन शॉल/इन्स्टा)
-
जर कोणी ते पाहू शकत नसेल, तर ती त्यांची समस्या आहे, त्याची जबाबदारी माझी नाही. त्यानंतर रोहमनने सुश्मिता आणि तिच्या मुली रेने-अलिसा यांच्यासोबतच्या नातेसंबंधाबद्दल सांगितले. “मी नेहमीच म्हणतो की आम्ही कुटुंबासारखे आहोत”, असं रोहमन म्हणाला. (फोटो क्रेडिट: रोहमन शॉल/इन्स्टा)
-
“आम्ही आता एकत्र राहत नाही, किंवा कदाचित अनेक महिने बोलत नसू, पण जेव्हा त्यांना माझी गरज असेल, मी नेहमीच त्यांच्यासोबत असेन,” असं रोहमन म्हणाला. ‘अमरन’ नंतर त्याला आता चांगले काम मिळत आहे, असंही रोहमनने सागंतलं. (फोटो क्रेडिट: रोहमन शॉल/इन्स्टा)
-
माझी इच्छा होती की लोकांनी ‘अमरन’मध्ये माझे काम पाहावे आणि मी काय करण्यास सक्षम आहे ते पाहून मला त्यानुसार काम द्यावे, ज्याची सुरुवातही झाली आहे. याबद्दल मला खरोखर खूप आनंद झाला आहे. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. (फोटो क्रेडिट: रोहमन शॉल/इन्स्टा)
-
त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना रोहमन म्हणाला, “खलनायकाची भूमिका साकारण्याच्या कल्पनेनेच मला धक्का बसला होता, कारण मी खऱ्या आयुष्यात पूर्णपणे विरुद्ध आहे. हे माझ्यासाठी मनोरंजक होते, कारण मी ते आव्हान म्हणून घेतले.” (फोटो क्रेडिट: रोहमन शॉल/इन्स्टा)
-
रोहमन हा अनेक ब्रँड्ससाठी मॉडेलिंगदेखील करतो.
रोहमन शॉल ३ वर्षांनंतर सुश्मिता सेनबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाला, “मी खूप…”
रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन त्यांच्या नात्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही या विषयावर उघडपणे बोलले नाही. पहिल्यांदाच रोहमनने त्याच्या व सुश्मिताच्या नात्याबद्दल भाष्य केलंय.
Web Title: Rohman shawl opens up about his relationship with sushmita sen and her daughters hrc