• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why shabana azmi and javed akhtar once decided end their relationship actress reveals reason nsp

शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी का नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय? घ्या जाणून…

Shabana Azmi: काय म्हणाल्या लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी?

Updated: December 13, 2024 21:03 IST
Follow Us
  • Shabana Azmi And Javed Akhtar
    1/12

    लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) व गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे.

  • 2/12

    नुकतीच त्यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली.

  • 3/12

    शबाना आझमी व जावेद अख्तर अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसतात.

  • 4/12

    अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘रेडिओ नशा ऑफिशियल’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटले, “माझ्या आईने मला सांगितले होते की, शायर व कवी यांच्यामध्ये अडकू नकोस. ते चांगले चांगले शब्द बोलून त्यातच फसवतील आणि मी त्यातच अडकले.”

  • 5/12

    “मला माहीत नव्हते की, आमच्यामधील कोण पहिल्यांदा प्रेम व्यक्त करणार. पण, आम्हाला एकमेकांशी बोलायला आवडायचे.”

  • 6/12

    “इतर कोणत्याच गोष्टी कळायच्या नाहीत. एकदा आम्ही आमचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता. कारण- परिस्थिती कठीण होती.त्यानंतर आम्ही तीन महिने एकमेकांशी बोललोच नाही.”

  • 7/12

    “एकदा शेवटचे भेटू या विचाराने आम्ही भेटलो. बाकीच्या सर्व गोष्टींबद्दल खूप बोललो आणि शेवटी आमचे नाते संपवण्याचा विचार सोडून दिला”, अशी आठवण शबाना आझमींनी सांगितली आहे.”

  • 8/12

    जावेद अख्तर यांच्याबद्दल पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “ते खूप प्रामाणिक आहेत. ते त्यांच्यापेक्षाही वयाने लहान लोकांशी नम्रतेने बोलतात, हे मला खूप आवडते.”

  • 9/12

    “त्यांची जी तत्त्वे आहेत तीसुद्धा मला फार आवडतात. याबरोबरच त्यांची विनोदबुद्धी व हुशारी हे गुणसुद्धा मला फार आवडतात.”

  • 10/12

    “जावेद अख्तर व त्यांच्यामध्ये काय फरक आहे? यावर बोलताना त्यांनी म्हटले, “मी खूप विस्ताराने व छोट्या गोष्टींचा विचार करते आणि ते प्रत्येक गोष्टीचा मोठा विचार करतात. आम्ही जेव्हा आमचे घर बांधत होतो, त्यावेळी आमच्यात वाद झाला होता.”

  • 11/12

    “मी आठवड्याच्या शेवटी आराम करण्यासाठी कॉटेजचा विचार करत होते; मात्र त्यांनी मोठे घर बांधायचे ठरवले. आम्ही या गोष्टीवरून भांडलो होतो.”

  • 12/12

    “त्यावेळी त्यांच्या मित्राने मला सांगितले की, जावेदजींना एकेकाळी रस्त्यावर झोपावे लागले आहे. तीन-तीन दिवस अन्नाशिवाय उपाशी राहावे लागले आहे. हे घर बांधणे त्यांचे स्वप्न आहे. तू तुझे आयुष्य उत्तमपणे जगशील. त्यामुळे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करू दे.” (सर्व फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)

TOPICS
जावेद अख्तरJaved AkhtarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशबाना आजमीShabana Azmi

Web Title: Why shabana azmi and javed akhtar once decided end their relationship actress reveals reason nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.