-
बॉलीवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता हर्षवर्धन राणे आज १६ डिसेंबर रोजी त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
‘सनम तेरी कसम’ सारख्या चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या हर्षवर्धनचे जीवन संघर्षांनी भरलेले राहिले. आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम येथे जन्मलेल्या हर्षवर्धनने चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध केले.
-
हर्षवर्धन राणेने लहान वयातच त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोठे पाऊल उचलले. अवघ्या १६ व्या वर्षी अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन तो घरातून पळून गेला. इंडस्ट्रीत गॉडफादर किंवा कनेक्शनशिवाय, त्याने स्वत: साठी एक मार्ग तयार केला. सुरुवातीला हर्षवर्धनने फ्रीलांसर म्हणून इंडस्ट्रीत काम केले.
-
२००८ मध्ये त्याने ‘लेफ्ट राईट लेफ्ट’ या हिंदी टीव्ही मालिकेतून अभिनय करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला.
-
‘ना इष्टम’, ‘अवुनू दोन्ही’, ‘प्रेमा इश्क मुश्किल’, ‘अनामिका’ आणि ‘माया’ यांसारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
-
हर्षवर्धनला ‘सनम तेरी कसम’ या रोमँटिक चित्रपटाने बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली. या चित्रपटात त्याची आणि मावरा होकेनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
-
या चित्रपटाच्या यशानंतरही हर्षवर्धनला बॉलीवूडमध्ये फार काम मिळालं नाही. तो बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहिला, पण त्याने हार मानली नाही.
-
अभिनय करिअमुळे हर्षवर्धनचा अभ्यास अपूर्ण राहिला होता. मात्र, ४० व्या वर्षी त्यांनी पुन्हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
-
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) मधून त्याने मानसशास्त्र ऑनर्सला प्रवेश घेतला. हर्षवर्धनने त्याच्या अभ्यासाबाबत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते.हर्षवर्धनने कॉलेजचे पहिले वर्ष पूर्ण केले आहे. यावर्षी त्याने भोपाळमध्ये पहिल्या वर्षाची अंतिम परीक्षा दिलेली. त्याने कॉलेजचे पहिले वर्ष ८१.५% गुणांसह उत्तीर्ण केले.
-
हर्षवर्धनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून त्याचा प्रवास आणि पहिल्या वर्षाची मार्कशीट चाहत्यांशी शेअर केली होती. या व्हिडीओमध्ये तो आपल्या शिक्षक आणि वरिष्ठांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. त्याच्या या जिद्दीने त्याच्या चाहत्यांना आणि तरुणांना प्रेरणा दिली.
-
१६ व्या वर्षी घर सोडण्यापासून ते ४० व्या वर्षी पुन्हा विद्यार्थी बनण्यापर्यंत त्याने आपल्या धैर्याने आणि चिकाटीने सिद्ध केले की अपयश ही फक्त एक पायरी आहे आणि कठोर परिश्रमाने आपली स्वप्नं पूर्ण करता येतात.
-
हर्षवर्धन लवकरच ‘कुन फाया कुन’ या चित्रपटात दिसणार आहे. (सर्व फोटो – हर्षवर्धन राणे इन्स्टाग्राम)
१६ व्या वर्षी घरातून पळाला, चित्रपट केले; ४० व्या वर्षी परीक्षा देऊन बॉलीवूड अभिनेत्याने मिळवले ८१.५ टक्के गुण
Harshvardhan Rane : हर्षवर्धन राणेला ‘सनम तेरी कसम’ सिनेमातून खूप लोकप्रियता मिळाली.
Web Title: Sanam teri kasam actor harshvardhan rane resume study at 40 got 81 percent in college first year hrc