• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. govindas blockbuster 6 movies how much did these movies earn in 90s spl

गोविंदाचे ब्लॉकबस्टर ६ चित्रपट, आजही लोकप्रिय असलेल्या या सिनेमांनी ९० च्या दशकात किती कमाई केलेली? जाणून घ्या

Govinda Blockbuster Movies : गोविंदाला चित्रपटसृष्टीत 37 वर्षे झाली आहेत आणि या वर्षांत त्याने त्या काळातील अनेक टॉप अभिनेत्रींबरोबर 170 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Updated: December 21, 2024 12:38 IST
Follow Us
  • Govinda Blockbuster Movies
    1/9

    90 च्या दशकात अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. पण आजही जर कोणाची सर्वाधिक चर्चा होत असेल तर तो आहे अभिनेता गोविंदा आहे.

  • 2/9

    ज्याने त्याच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले. मात्र, आजही त्याने ९० च्या दशकात केलेल्या चित्रपटांची बरोबरी कोणी करू शकत नाही. आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त अशाच काही ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. त्याच्या या लोकप्रिय सिनेमांपैकी काहींचे सिक्वेल आले आहेत, परंतु गोविंदाच्या ओरीजीनल चित्रपटांना कोणीही मागे टाकू शकले नाही.

  • 3/9

    90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा गोविंदा आज त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईतील विरार येथे झाला. त्याचे पूर्ण नाव गोविंद अरुण आहुजा आहे. गोविंदाने 1986 मध्ये ‘इलजाम’ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदाला चित्रपटसृष्टीत 37 वर्षे झाली आहेत आणि या वर्षांत त्याने त्या काळातील अनेक टॉप अभिनेत्रींबरोबर 170 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 4/9

    कुली नंबर 1
    हा एक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट 1995 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर होता. या चित्रपटातील गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीने सर्वांची मनं जिंकली. चित्रपटाचे बजेट 3.50 कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर त्याने अंदाजे 21.15 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचा सिक्वेल 2020 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये वरुण धवन आणि सारा अली खान दिसले होते, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

  • 5/9

    साजन चले ससुराल
    डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘साजन चले ससुराल’ हा सर्वोत्कृष्ट रोमँटिक कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. ज्यामध्ये गोविंदासोबत करिश्मा कपूर आणि तब्बूही आहेत. चित्रपटात गोविंदा दोन लग्नात अडकतो. 4.25 कोटी रुपयांच्या बजेटसह आणि बॉक्स ऑफिसवर अंदाजे 13.82 कोटी रुपयांची कमाई करून हा चित्रपट त्या वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. दोन लग्ने दाखवणारे अनेक चित्रपट बनले आहेत, पण आजपर्यंत या चित्रपटाला कोणीही टक्कर देऊ शकले नाही.

  • 6/9

    दीवाना मस्ताना
    गोविंदा, अनिल कपूर आणि जुही चावला अभिनीत ‘दीवाना मस्ताना’ हा चित्रपट देखील एक उत्तम विनोदी चित्रपट आहे, ज्याने त्या वर्षी अभूतपूर्व व्यवसाय केला. या चित्रपटात सलमान खानचाही एक कॅमिओ होता. या चित्रपटाचे बजेट 6 कोटी रुपये होते आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 24 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शनही डेव्हिड धवनने केले होते. आजपर्यंत या चित्रपटासारखा दुसरा चित्रपट बनलेला नाही तसेच यानंतर तिघेही इतर कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.

  • 7/9

    बडे मियाँ छोटे मियाँ
    गोविंदा आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची मने जिंकली, त्याने अनेक विक्रम मोडले. हा चित्रपट 1998 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट होता. चित्रपटाचे बजेट 12 कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर 35-36 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शनही डेव्हिड धवनने केले होते. या वर्षी याच नावावर एक चित्रपट प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर आपटल्याचे पहायला मिळाले.

  • 8/9

    दुल्हे राजा
    डेव्हिड धवन दिग्दर्शित रवीना टंडन आणि गोविंदा अभिनीत ‘दुल्हे राजा’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 1998 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत त्या वर्षातील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटाचे बजेट अंदाजे 5 कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 21.45 कोटींची कमाई केली होती. कादर खान, जॉनी लीव्हर सारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसले होते. आजपर्यंत या चित्रपटासारखा दुसरा चित्रपट बनलेला नाही.

  • 9/9

    हसीना मान जायेगी
    गोविंदा, संजय दत्त, करिश्मा कपूर आणि पूजा बत्रा यांच्या ‘हसीना मान जायेगी’ या चित्रपटाने त्यावर्षी भरपूर कमाई केली होती. हा देखील रोमान्स आणि ॲक्शनने परिपूर्ण विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट 9 कोटी रुपये होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 26.10 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटानंतर गोविंदा आणि संजय दत्तची जोडी खूप प्रसिद्ध झाली.

TOPICS
गोविंदाGovindaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Govindas blockbuster 6 movies how much did these movies earn in 90s spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.