-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकरने नुकतीच आनंदाची बातमी दिली. लवकरच तो लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्याने जाहीर केलं.
-
तसंच अक्षयने नात्याला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने गर्लफ्रेंड ‘रमा’ला सर्वांसमोर आणलं.
-
‘बिग बॉस’मध्ये अक्षयने अभिनय क्षेत्रातील संघर्षाच्या काळात ‘रमा’ने कशी साथ दिली याविषयी सांगितलं होतं. “आमची प्रेमकथा फिल्मी” असल्याचं तो म्हणाला होता.
-
‘बिग बॉस’मध्ये असताना अक्षयला खास ‘रमा’ने पत्र पाठवलं होतं. यावेळी त्याने पुढच्या एक-दोन वर्षांत ‘रमा’ नक्की कोण आहे? याचा खुलासा होईल असं सांगितलं होतं. अखेर २२, डिसेंबरला यावरचा पडदा उठला.
-
अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ सगळ्यांसमोर आली आहे. २३ डिसेंबरला दोघांच्या नात्याला १० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अक्षयने एक दिवस आधी ‘रमा’ कोण आहे? याचा खुलासा केला आहे.
-
‘रमा’बरोबर सुंदर व्हिडीओ शेअर करत अक्षयने लिहिलं, “तर ही माझी रमा…उद्या आम्हाला १० वर्ष पूर्ण होतायत… म्हटलं एक दिवस आधीच सांगाव…म्हणून… बापरे! फाइनली सांगतोय मी…पण काहीही झालं तरी आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही,”
-
अक्षय केळकरच्या ‘रमा’चं खरं नाव साधना काकतकर असं आहे. ती गायिका, गीतकार आहे. अक्षय केळकर आणि समृद्धी केळकरच्या ‘नाखवा’, ‘मैतरा’ गाण्यांसाठी साधनाने काम केलं होतं. साधनाचा मंत्रमुग्ध आवाज ऐकूनच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता.
-
नुकताच अक्षयने साधनाबरोबर पहिला व्लॉग केला. या व्लॉगमध्ये अभिनेत्याने ‘रमा’ नावाने हाक का मारतो आणि लव्हस्टोरी सांगितली.
-
अक्षयला ‘रमा’ हे नाव खूप आवडतं. त्यामुळे नात्याच्या सुरुवातीपासून अभिनेता गर्लफ्रेंडला ‘रमा’ या नावाने हाक मारतो
-
त्याच्या फोनमध्ये साधनाचा नंबर ‘रमा’ नावाने सेव्ह केला आहे.
-
अक्षयने साधनाला एकांकिकेत गात असताना पाहिलं. तिचा आवाज ऐकून अक्षयने ठरवलं की, हीच माझी प्रेयसी आणि बायको असेल. त्यानंतर अक्षयने सोशल मीडियाद्वारे तिच्या आवाजाचं कौतुक केलं.
-
मग काही दिवसांनंतर अक्षयने दोन वेळा प्रपोज केलं. पण दोन्ही वेळेला साधनाने नकार दिला. अखेर साधनाने प्रपोज केलं आणि मग अक्षय-रमाची फिल्मी लव्हस्टोरी सुरू झाली. ( सर्व फोटो सौजन्य – अक्षय केळकर इन्स्टाग्राम )
Photos: अक्षय केळकर गर्लफ्रेंडला ‘रमा’ नावाने हाक का मारतो? अभिनेत्याची फिल्मी लव्हस्टोरी वाचा
अभिनेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड काय करते? जाणून घ्या…
Web Title: Bigg boss marathi season 4 winner akshay kelkar filmy love story pps