• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 9 malayalam romantic comedie movies that will make you fall in love again spl

प्रेमातलं वेड, हसरे क्षण, विरह, वेदना जागे करणारे ‘हे’ ९ मल्याळम चित्रपट पाहिलेत का? OTT वर उपलब्ध

Best Malayalam RomComs: मल्याळम सिनेमांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये काहीतरी खास आहे जे केवळ प्रेक्षकांना हसवतच नाहीत तर आपसुकचं हृदयालाही स्पर्श करतात. तुम्हालाही अशा चित्रपटांची आवड असेल तर तर हे ९ मल्याळम चित्रपट अजिबात चुकवू नका.

Updated: December 30, 2024 12:46 IST
Follow Us
  • Avashyamund Varane
    1/10

    मल्याळम सिनेसृष्टीतील रोमँटिक कॉमेडी चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनांवर राज्य केलं आहे. प्रेम, कॉमेडी आणि आयुष्यातील चढ-उतार या चित्रपटांमध्ये सुंदरपणे दाखवण्यात येतात. जर तुम्हीही रोमान्स आणि कॉमेडी चित्रपट शोधत असाल तर आम्ही तुम्हाला काही सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडतील. (Still From Film)

  • 2/10

    Hridayam (2022)
    ‘हृदयम्’ हा एक हृदयस्पर्शी रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो एका मुलाचा आयुष्यातील प्रवास दाखवतो. या चित्रपटात अरुणची भूमिका आहे, जो त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये एक निश्चिंत जीवन जगतो आणि नंतर जीवनाचे विविध पैलू शिकतो. प्रेक्षकांना जीवनातील सत्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट एक प्रेरणादायी आणि भावनिक प्रवास आहे. तुम्ही हा चित्रपट Disney + Hotstar वर पाहू शकता. (Still From Film)

  • 3/10

    Varane Avashyamund (2020)
    ‘वर्णे अवश्यमुंड’ हा मल्याळम रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर आधारित आहे. प्रेम, कौटुंबिक आणि नातेसंबंधांचे परिवर्तन या चित्रपटात सुंदरपणे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात एक एकटी आई आणि तिच्या मुलीची कथा आहे जिच्या आयुष्यात नवीन बदल होतात. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (Still From Film)

  • 4/10

    Thanneer Mathan Dinangal (2019)
    हा चित्रपट शाळेतील रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे जो एका मुलाच्या त्याच्या शाळेतील शिक्षकेवरील आणि मुलीवरील प्रेमाची रंजक कथा दाखवतो. चित्रपटातील हलकीफुलकी आणि कॉमिक शैली हा एक उत्तम रोमांच बनवते. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still From Film)

  • 5/10

    June (2019)
    ‘जून’ मध्ये एका मुलीच्या आयुष्यातील प्रवासाचे चित्रण केले आहे, तिच्या प्रेमाची, मैत्रीची आणि आत्मविश्वासाची सुंदर कथा या चित्रपटात आहे. हा चित्रपट त्या सर्वांसाठी आहे जे तरुणपणात प्रेम आणि ब्रेकअपच्या अनुभवातून जातात. तुम्ही हा चित्रपट Disney + Hotstar वर पाहू शकता. (Still From Film)

  • 6/10

    Aanandam (2016)
    हा चित्रपट सात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कथा सांगतो जे त्यांच्या पहिल्या महाविद्यालयीन सहलीसाठी गोवा आणि हम्पी येथे जातात. वाटेत ते मैत्री, प्रेम आणि जीवनाबद्दल महत्त्वाचे धडे शिकतात. हा चित्रपट जीवनातील साध्या आणि सुंदर पैलूंवर प्रकाश टाकतो. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still From Film)

  • 7/10

    Premam (2015)
    ‘प्रेमम’ हा एक मल्याळम रोमँटिक चित्रपट आहे जो एका मुलाच्या आयुष्यातील तीन वेगवेगळ्या प्रेमकथा दाखवतो. हा चित्रपट केवळ रोमान्सच नाही तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रेम आणि मैत्रीच्या भूमिकेवरही प्रकाश टाकतो. तुम्ही हा चित्रपट Disney + Hotstar वर पाहू शकता. (Still From Film)

  • 8/10

    Two Countries (2015)
    ‘टू कंट्रीज’ एक मजेदार रोमँटिक कॉमेडी आहे ज्यामध्ये एक तरुण आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एका श्रीमंत मुलीशी लग्न करण्याचा विचार करतो. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेम, नातेसंबंध आणि जीवनातील गुंतागुंत यांच्याशी निगडीत हलकीफुलकी कथेचा अनुभूति देतो. तुम्ही हा चित्रपट Disney + Hotstar वर पाहू शकता. (Still From Film)

  • 9/10

    Ohm Shanthi Oshaana (2014)
    ‘ओम शांती ओशना’ ही एका तरुणीची कथा आहे जी तिचे पहिले प्रेम मिळवण्यासाठी सात वर्षे संघर्ष करते. हा चित्रपट एका मुलीच्या जिद्द, प्रेम आणि मेहनतीची प्रेरणादायी कथा आहे. तुम्ही हा चित्रपट Disney + Hotstar आणि Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still From Film)

  • 10/10

    Thattathin Marayathu (2012)
    ‘थट्टाथिन मरायाथु’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांच्यातील प्रेमकथा दाखवतो. दोन व्यक्ती त्यांच्या धर्म आणि संस्कृतीतील फरकांवर मात करून एकमेकांवर कसे प्रेम करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still From Film)हेही पाहा- Photos : ब्रिटनमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशलचा रोमँटिक अंदाज, व्हेकेशन फोटो व्हायरल

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: 9 malayalam romantic comedie movies that will make you fall in love again spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.