-
गुगलने २०२४ मध्ये जगभरात सर्वाधिक सर्च केलेल्या अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडमधील बड्या स्टार्सची नावे नाहीत. (फोटो: पेक्सेल्स)
-
२०२४ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या स्टार्समध्ये तीन भारतीय कलाकारांची नावे आहेत. ज्यामध्ये एक अभिनेता आणि दोन अभिनेत्रींची नावे आहेत. (फोटो: पेक्सेल्स)
-
हा अभिनेता बॉलिवूडचा नसून साऊथ चित्रपटसृष्टीतील आहे. यासोबतच दोन अभिनेत्रींच्या नावांचा शोध घेण्यात आला असून, एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि दुसरी बॉलिवूडमधील आहे, पण त्यात कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, करीना कपूर किंवा आलिया भट्ट यांचे नाव नाही. (फोटो: कतरिना कैफ/आलिया भट्ट/एफबी)
-
पवन कल्याण हा जगभरात सर्वाधिक सर्च केलेला भारतीय अभिनेता आहे. कॅट विल्यम्स पहिल्या तर पवन कल्याण दुसऱ्या स्थानावर आहे. (फोटो: पवन कल्याण/एफबी)
-
दरम्यान, २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे तेलुगू सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक पवन कल्याण जगाच्या नजरेसमोर आले. याशिवाय, त्यांच्या चित्रपट आणि दानशूरपणामुळे त्यांना जागतिक शोध यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे ११ वे उपमुख्यमंत्री बनले आहेत. (फोटो: पवन कल्याण/एफबी)
-
पवन कल्याण व्यतिरिक्त, टेलिव्हिजनच्या स्टार अभिनेत्रींपैकी एक हिना खान ही जगातील पाचवी अभिनेत्री आहे जिला २०२४ मध्ये सर्वाधिक वेळा शोधण्यात आले. हिना खानला यावर्षी कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे तिला संपूर्ण जगातून सर्वाधिक वेळा शोधण्यात आले. अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजने त्रस्त असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. (फोटो: हिना खान/FB)
-
जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक शोधली जाणारी भारतीय अभिनेत्री निम्रत कौर या यादीत आठव्या स्थानावर आहे. (फोटो: निम्रत कौर/एफबी)
-
दरम्यान, या वर्षी निम्रत कौर आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल अफवा पसरल्या होत्या, त्यानंतर निम्रत कौर जागतिक स्तरावर प्रसिद्धीच्या झोतात आली होती. (फोटोः इन्स्टाग्राम)
२०२४ मध्ये ‘या’ तीन भारतीय स्टार्सना जगाने सर्वाधिक वेळा शोधले, २ अभिनेत्रींचा समावेश
Most Globally Searched Indian Actors in 2024: २०२४ मध्ये संपूर्ण जगात सर्वाधिक शोधलेल्या अभिनेत्यांच्या यादीत तीन भारतीय तारे आहेत. त्यात एक अभिनेता आणि दोन अभिनेत्रींचा समावेश आहे.
Web Title: Three most globally searched indian actors in 2024 on is tv actress spl