• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress tejashri pradhan has kept the mangalsutra from honar soon me hya gharchi popular serial pps

Photos: तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र स्वतःकडे का ठेवलं? जाणून घ्या…

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र जपून ठेवण्यामागचं कारण वाचा…

Updated: December 31, 2024 16:13 IST
Follow Us
  • ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधान सध्या मराठी इंडस्ट्रीतील आघाडी अभिनेत्री झाली आहे.
    1/12

    ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधान सध्या मराठी इंडस्ट्रीतील आघाडी अभिनेत्री झाली आहे.

  • 2/12

    तेजश्रीच्या प्रत्येक मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत असतात.

  • 3/12

    तेजश्रीने साकारलेली जान्हवी जितकी प्रेक्षकांना आवडली तितकीच ‘अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा आणि आता ‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील पडली आहे. तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे.

  • 4/12

    तेजश्री प्रधान सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबर विविध चित्रपटांमध्ये दिसत आहे.

  • 5/12

    २० डिसेंबरला, तेजश्रीचा नवा चित्रपट ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ प्रदर्शित झाला. आनंद गोखले दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटात ती गायत्रीच्या भूमिकेत झळकली आहे.

  • 6/12

    ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ तेजश्रीसह अभिनेता सुबोध भावे, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, उदय नेने, संजय खापरे, प्रदीप वेलणकर अशी बरीच तगडी कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

  • 7/12

    काही दिवसांपूर्वी तेजश्रीने ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘तारांगण’ युट्यूब चॅनेलशी संवाद साधला होता. यावेळी तिने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील एक गोष्ट जपून ठेवल्याचा खुलासा केला. ही गोष्ट दुसरी-तिसरी कोणती नसून मालिकेतील तिचं मंगळसूत्र आहे.

  • 8/12

    तेजश्री प्रधान म्हणाली होती, “मी ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका करत होते, तेव्हा जान्हवीचं मंगळसूत्र खूप लोकप्रिय झालं होतं. अफाट लोकप्रियता त्या मंगळसूत्राला मिळालीये.”

  • 9/12

    पुढे तेजश्री म्हणाली की, आजही कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये गेलं तरी त्याबद्दल बोललं जातं. त्यामुळे ते मंगळसूत्र खूप लोकप्रिय झाल्याने मला ते माझ्याकडे ठेवायचं असं ठरवलं.

  • 10/12

    “कारण आयुष्यातली पहिली लोकप्रिय झालेली ही गोष्ट होती. तर मी ‘मी होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र जपून ठेवलंय,” असं तेजश्रीने सांगितलं.

  • 11/12

    सध्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटातील तेजश्रीच्या कामाचं खूप कौतुक होतं आहे.

  • 12/12

    तसंच तेजश्री आणि सुबोध भावेच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम )

TOPICS
तेजश्री प्रधानTejashree PradhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress tejashri pradhan has kept the mangalsutra from honar soon me hya gharchi popular serial pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.