-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेतून अभिनेता कपिल होनराव घराघरांत लोकप्रिय झाला.
-
काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कपिलने या मालिकेत मल्हार ही भूमिका साकारली होती.
-
कपिल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. काही दिवसांआधीच त्याने मुंबईत हक्काचं घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली.
-
गावावरुन मुंबई येणं, अभिनयाचं स्वप्न पाहणं, १० बाय १० च्या खोलीत वास्तव्य आयुष्यात असा मोठा संघर्ष करून अभिनेत्याने आजच्या घडीला अंधेरी भागात आलिशान घर घेतलं आहे.
-
या सगळ्यात कपिलला त्याच्या पत्नीची मोठी साथ मिळाली. नुकतंच अभिनेत्याने पत्नीसह आपल्या नव्या घरात पहिलं फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
-
कपिलच्या नव्या घराच्या खिडकीतून आजूबाजूचा सुंदर असा व्ह्यू दिसतो.
-
कपिलने या फोटोंना “फायनली २०२४ मध्ये मुंबईकर झालो” असं कॅप्शन दिलं आहे.
-
कपिलच्या या नव्या घरातील पहिल्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : कपिल होनराव इन्स्टाग्राम )
१० बाय १० ची खोली ते मुंबईत हक्काचं घर! मराठी अभिनेत्याचं नव्या घरात पहिलं फोटोशूट, पत्नीसह शेअर केले फोटो
‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ फेम अभिनेत्याची स्वप्नपूर्ती, नव्या घरात केलं खास फोटोशूट, पाहा फोटो
Web Title: Marathi actors kapil honrao first photoshoot in new home in mumbai with wife sva 00