-
मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
‘दिल चाहता हैं’, ‘दोघी’, ‘गुलाबजाम’, ‘प्यार तुने क्या किया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.
-
प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
-
अभिनेत्रीने नुकतीच नवीकोरी गाडी खरेदी केली आहे.
-
सोनालीने मर्सिडीज-बेंझ ही गाडी खरेदी केली आहे.
-
अभिनेत्रीने गाडी खरेदी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सोनालीने शोरुममध्ये आपल्या कुटुंबीयांसह नव्या गाडीची पूजा केली.
-
फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या Mercedes-Benz GLC गाडीची किंमत ७३.५० लाख ते ७४.५० लाख (एक्स शोरुम ) इतकी आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीच्या नव्या गाडीच्या फोटोंवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : autohangar इन्स्टाग्राम)
Photos : सोनाली कुलकर्णीच्या नव्या गाडीचे फोटो पाहिलेत का? मर्सिडीज-बेंझची किंमत ऐकून थक्क व्हाल…
सोनाली कुलकर्णीने खरेदी केलेल्या मर्सिडीज-बेंझ गाडीची किंमत किती? पाहा अभिनेत्रीच्या नव्याकोऱ्या कारचे फोटो…
Web Title: Sonali kulkarni buys new mercedes car with family dil chahta hai actress shares photos sva 00