-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात झळकलेला लोकप्रिय अभिनेता नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.
-
सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. हास्यजत्रा तसेच मराठी नाटकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सनीभूषण मुणगेकर विवाहबंधनात अडकला आहे.
-
लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
-
सनीभूषण मुणगेकरने अभिनेत्री दिपश्री कवळेशी लग्नगाठ बांधली आहे.
-
लग्नाच्या फोटोंना या जोडप्याने “श्री व सौ मुणगेकर” असं कॅप्शन दिलं आहे.
-
सनीभूषण आणि दिपश्री या दोघांनी लग्नसोहळ्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
दिपश्रीने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
-
दिपश्री ‘बाळुमामाच्या नावाने चांगभलं’, ‘गाथा नवनाथांची’, ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकांमध्ये झळकली आहे. तसेच काही नाटकांमध्ये देखील तिने भूमिका साकारल्या आहेत.
-
तर, सनीभूषण मुणगेकर सध्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात काम करतोय. याआधी त्याने हास्यजत्रेसह ‘सन मराठी’ वाहिनीच्या ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत सुद्धा काम केलेलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सनीभूषण मुणगेकर व दिपश्री इन्स्टाग्राम अकाऊंट )
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मालिकाविश्वातील ‘या’ अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ! दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आले समोर
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame marathi actor sunnybhushan mungekar and actress deepashri wedding photos sva 00