• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. saif ali khan admitted to lilavati hospital know about his net worth property career cars and lifestyle spl

Saif Ali Khan : राजवाडा, बंगले, कोट्यवधींच्या गाड्या अन् बरचं काही; छोटा नवाब सैफ अली खानची संपत्ती किती?

सैफ अली खानची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्समध्ये केली जाते. त्याच्याकडे केवळ वडिलोपार्जित संपत्तीच नाही तर स्वत: या अभिनेत्यानेही करोडोंची संपत्ती कमावली आहे.

Updated: January 16, 2025 11:12 IST
Follow Us
    saif ali khan attack, saif ali khan net worth
    बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे.
    त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आपण त्याच्या संपत्ती आणि लाईफस्टाईल बद्दल जाणून घेऊयात. सैफकडे केवळ वडिलोपार्जित संपत्तीच नाही तर स्वत: या अभिनेत्यानेही करोडोंची मालमत्ता कमावली आहे.
    बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान चित्रपटांशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्समध्ये केली जाते.
    ५४ वर्षांचा असलेल्या सैफ अली खानने १९९३ मध्ये आलेल्या ‘परंपरा’ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यानंतर हा अभिनेता अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला. सैफ अली खानच्या कमाईचा मुख्य स्त्रोत आहे तो म्हणजे त्याचे चित्रपट.
    सैफकडे वडिलोपार्जित संपत्ती तर आहेच, यासोबतच या अभिनेत्यानेही करोडोंची संपत्ती कमावली आहे. दरम्यान सैफ पतौडी घराण्याचा १०वा नवाब आहे आणि हा धाकटा नवाब शाही जीवनशैली जगतो.
    मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खान जवळपास ११८० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. बॉलिवूडच्या महागड्या कलाकारांच्या यादीत सैफचा समावेश होतो. अभिनयाव्यतिरिक्त, तो चित्रपटांच्या नफ्याचा वाटा, ब्रँड एंडोर्समेंट आणि वैयक्तिक गुंतवणूकीतून देखील कमावतो.
    सैफ अली खानचा वडिलोपार्जित राजवाडा हरियाणातील पतौडी येथे आहे. या आलिशान महालाची किंमत ८०० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. सैफकडे आणखी दोन बंगले आहेत, ज्यांची रचना ऑस्ट्रियाच्या वास्तुविशारदांनी केली आहे. याशिवाय त्याचे मुंबईतही एक आलिशान अपार्टमेंटही आहे.
    सैफला महागड्या गाड्यांचाही खूप शौक आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Audi, BMW 7 Series, Lexus 470, Mustang, Range Rover आणि Land Cruiser सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे.
    वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सैफ अली खानचा ‘देवरा पार्ट १’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याने ज्युनिअर एनटीआरहबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. हेही पाहा- हिटलर ते मुसोलिनी; ‘या’ १० हुकुमशहांनी केला मोठा नरसंहार, त्यांचा मृत्यू कसा झाला?
TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसैफ अली खानSaif Ali Khan

Web Title: Saif ali khan admitted to lilavati hospital know about his net worth property career cars and lifestyle spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.