• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tula shikvin changlach dhada fame hrishikesh shelar on his education says completed mba nsp

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम हृषिकेश शेलार त्याच्या शिक्षणाबाबत म्हणाला…

Hrishikesh Shelar: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय? घ्या जाणून…

Updated: January 24, 2025 01:21 IST
Follow Us
  • Hrishikesh Shelar
    1/9

    ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मालिकेतील अधिपती व अक्षरा ही पात्रे आज घराघरांत पोहोचलेली दिसतात. अक्षराचे पात्र अभिनेत्री शिवानी रांगोळे, तर अधिपतीचे पात्र अभिनेता हृषिकेश शेलार(Hrishikesh Shelar)ने साकारले आहे.

  • 2/9

    मालिकेत अधिपतीचे पात्र अशिक्षित असल्याचे पाहायला मिळते. मात्र, खऱ्या आयुष्यात हृषिकेश शेलारचे शिक्षण किती झाले आहे, याबद्दल जाणून घेऊ.

  • 3/9

    अभिनेता हृषिकेश शेलारने नुकतीच ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल, नाटकात काम करण्याच्या आवडीबद्दल वक्तव्य केले. त्याबरोबरच त्याने त्याच्या शिक्षणाबद्दलही सांगितले आहे.

  • 4/9

    हृषिकेश शेलारने म्हटले की माझी नाटकात काम करण्याची सुरुवात गणेशोत्सवात छोटी छोटी नाटुकली करण्यातून झाली. शाळेत सुरुवातीला अभ्यासात ४-५ वी पर्यंत बरा होतो. नंतर मला अभ्यासात गती आणि रुची वाटेना.

  • 5/9

    १० वीचं वर्ष आल्यावर नाट्य शिबीर वगैरे बंद झालं. मला अभ्यासात अशीही रुची नव्हती. मला जेमतेम १० वीमध्ये ४६ टक्के असे काहीतरी मार्क्स पडले. ११ वीला विलिंग्डन कॉलेजला सायन्समध्ये प्रवेश घेतला. घरचे सगळे मेडिकल फिल्डमध्ये होते. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की, तू सायन्सला अ‍ॅडमिशन घे.

  • 6/9

    माझं त्यावेळी काही मत नव्हतं. मला फक्त नाटकच आवडायचं. १२ वीत मी फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्रजी यामध्ये मी ३५-३५ मार्क्स पाडून मी काठावर पास झालो. माझी जी गँग होती, ती सगळी नापास झाली. मी एकटा पास झालो. माझं तेवढं होतं की, मी पास झालो पाहिजे. त्यानिमित्तानं मला बाहेर पडता येईल, असं वाटायचं. मला ३८.८३ टक्के मार्क मिळाले.

  • 7/9

    मग विलिंग्डन कॉलेजलाच बी.एस्सी.ला अॅडमिशन केलं आणि मग मी परत नाटकात सहभागी होऊ लागलो. सांगलीतले काही नाटकाचे ग्रुप जॉइन केले. एकांकिका स्पर्धा, इंटर कॉलेज स्पर्धा असे सगळीकडे सहभागी झालो.मी ग्रॅज्युएशनला मायक्रोबायोलॉजी बी.एस्सी.मध्ये फर्स्ट क्लासने पास झालो. ३८ टक्के ते ६० टक्के हा माझ्यासाठी मोठा पल्ला होता.

  • 8/9

    एकांकिका करताना पुण्यातील नाटकाच्या संस्कृतीबद्दल समजलं. तेव्हा पुण्यात जायचं ठरवलं. त्यानंतर एमबीएला व्हीआयटीला अॅडमिशन घेतलं. तिथे दोन वर्षे मार्केटिंगमध्ये एमबीए केलं. २०१२ ला मार्केटिंगमध्ये एमबीए पूर्ण झालं.

  • 9/9

    कॅम्पस सिलेक्शन झालं. दोन-तीन कंपन्या दीड वर्षात बदलल्या. नाटकासाठी, स्पर्धांसाठी वेळ काढून पळायचो. चांगला पगार होता. २०१२ ला दर महिन्याचा सगळा खर्च भागून माझ्या अकाउंटला ४० हजार पगार असायचा. पण, मला त्यात काही मजा येईना. आपलं त्यात काही मन नाहीये, तर मन मारून किती करत राहणार, असं वाटलं. दोन दरडींवर पाय ठेवून जमणार नाही, हे समजलं. एक अंतिम निर्णय घ्यावा लागेल. मग घरच्यांना म्हटलं की, मला पूर्णवेळ अभिनेता म्हणून काम करायचं आहे आणि आता हेच वय आहे. मला परत पश्चात्ताप करायचा नाही. माझे वडिलांनी परवानगी दिली, असे म्हणत हृषिकेश शेलारने त्याच्या अभिनयाचा प्रवास सांगितला आहे. (सर्व फोटो सौजन्य: हृषिकेश शेलार इन्स्टाग्राम)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tula shikvin changlach dhada fame hrishikesh shelar on his education says completed mba nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.