-
अभिनेता गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani)नुकताच ‘फुलवंती’ या चित्रपटात दिसला होता. लवकरच तो ‘एक राधा एक मीरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
गश्मीर महाजनीने नुकतीच लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत आईविषयी बोलताना गश्मीरने म्हटले, “प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाची व्यक्ती ही आई असते. माझी आई व माझा मुलगा घरी असेल आणि बाहेर गेलो की सांगतो की घरी दोन लहान मुलं आहेत.”
-
“एक ७५ वर्षाचं व एक सहा वर्षाचं अशी दोन लहान मुले घरी आहेत.”
-
“५०-६० च्या पुढे गेलात ना की तुमच्या वयाचा उलट प्रवास सुरू होतो. हे मी माझ्या आईमध्ये पाहिलं. लहानपण पुन्हा येते.”
-
“मी आणि माझी बायको आता अशा टप्प्यावर आहोत जसं लहान मुलाला जपायचं तसंच आईलासुद्धा जपायचं. दोघांना आम्ही समान पातळीवर मानतो.”
-
“आई ही आई असते. माझ्या मुलाबरोबर खेळताना मी गौरीला बघतो. एका क्षणाला कडाक्याचं भांडण झालेलं असतं. खूप ओरडलेली असते आणि मग मी कुठेतरी बाहेर जातो, काहीतरी काम करतो. १० मिनिटात परत येतो.”
-
“मला असं वाटत असतं की त्याला बघूया, त्याचा मूड बरा आहे. तिचा मूड बरा आहे का? त्याला लागलं असेल, तो दुखावला गेला असेल, ती दुखावली गेली असेल आणि आतमध्ये जाऊन बघतो तर दोघे खिदळत असतात.”
-
“एकमेकांच्या कुशीत गेलेले असतात. त्यामुळे असे भांडण वैगेरे फार क्षणिक असतात. पाच-दहा मिनिटांकरिता असतात. मला आश्चर्य वाटतं की अरे १० मिनिटांपूर्वी इतका आरडा-ओरडा, रडारड सुरू होती. भांडण सुरू होतं. पाच-दहा मिनिटं परत तिच्या कुशीत जाऊन परत त्यांचं खिदळणं सुरूय.”
-
“प्रत्येकासाठी त्याची आई सर्वोत्तम असते. फार महत्वाची व्यक्ती असते. तुमच्या आयुष्यातील सर्वात जास्त, सर्वाधिक महत्वाची व्यक्ती ही आई असते”, असे म्हणत गश्मीर महाजनीने प्रत्येकासाठी त्याची आई सर्वोत्तम असते, असे म्हटले आहे.(सर्व फोटो सौजन्य: गश्मीर महाजनी इन्स्टाग्राम)
“फार क्षणिक…”, गश्मीर महाजनी आईबद्दल काय म्हणाला? घ्या जाणून…
Gashmeer Mahajani: ‘फुलंवती’ फेम अभिनेत्याचे वक्तव्य चर्चेत; गश्मीर महाजनी म्हणाला…
Web Title: Gashmeer mahajani reveals bonding between his wife and son also shares mother is important person of everyones life nsp