• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress ratan raajputh struggle story marriage broken and illness details spl

टीव्हीवर स्वयंवर करुनही अविवाहित; असाध्य आजाराच्या निदानानंतर अभिनेत्रीने सोडली होती इंडस्ट्री, आता करते…

या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का? बिहारच्या पाटणा येथे जन्मलेल्या या सामान्य घरातील मुलीने मुंबईत जाऊन तिची वेगळी ओळख निर्माण केली आणि टीव्हीच्या दुनियेत खूप नाव कमावले. तिचे टीव्हीवर स्वयंवरही झाले पण लग्न मात्र होऊ शकले नाही. चार वर्षांपासून ती अभिनयापासून दूर राहत आहे. एका असाध्य आजाराने तिची अवस्था बिकट झाली होती.

Updated: February 5, 2025 10:55 IST
Follow Us
  • Actress ratan raajputh struggle story marriage broken and illness details
    1/9

    आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेत आहोत, जिचा जन्म बिहारच्या पाटणा येथे एका सामान्य कुटुंबात झाला, पण तिने मोठी स्वप्ने पाहिली आणि मुंबईत जाऊन स्वतःचा ठसा उमटवला. पण त्याचबरोबर या अभिनेत्रीने खूप दु:खही पाहिले आणि तिच्या करिअरशिवाय वैयक्तिक आयुष्यातही खूप संघर्ष केला आहे. एकदा तर ही अभिनेत्री सी ग्रेड आणि ब्लू फिल्म्सच्या तावडीत अडकणार होती पण ती बचावली. तिने नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर देखील सादर केले, एंगेजमेंट झाली पण अजूनही ती अविवाहित आहे. इतकेच काय, अशा एका असाध्य आजाराने या अभिनेत्रीला घेरले होते की तिची टीव्ही कारकीर्दही जवळपास संपली.

  • 2/9

    बिहारमधील पाटणा ते मुंबई
    या अभिनेत्रीला तुम्ही ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ आणि ‘संतोषी माँ’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये पाहिलं असेल. ही अभिनेत्री रतन राजपूत आहे, तिचा जन्म बिहारच्या पाटणा येथे झाला आणि मुंबईत येऊन तिने स्वत:चे करिअर बनवले. रतन राजपूतने रंगभूमीपासून सुरुवात केली आणि नाटकात काम करताना तिला अभिनयाची आवड निर्माण झाली.

  • 3/9

    ‘राधा की बेटियां’ने नशीब बदलले
    रतन राजपूतने दूरदर्शनवरील टीव्ही शो ‘हाऊज दॅट’मधून सुरुवात केली. यात तिचं फार कमी काम होतं. ती फक्त एका एपिसोडमध्ये दिसली होती. यानंतर तिला टीव्ही मालिका ‘राधा की बेटियां’मध्ये मुख्य भूमिका मिळाली आणि ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि अनेक टीव्ही शोमध्ये काम केले.

  • 4/9

    वडील गेल्यानंतर…
    मात्र रतन राजपूत काही काळापासून अभिनयापासून दूर आहे. तिची याआधीची टीव्ही मालिका ‘संतोषी मा सुनाये व्रत कथाएं’ होता, जो २०२० मध्ये आला होता. यानंतर ती अभिनयापासून दुरावली. रतनने तिच्या कारकिर्दीत खूप संघर्ष केला आहे, परंतु २०२८ मध्ये तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्यामुळे तिला मोठा धक्का बसला.

  • 5/9

    आधी डिप्रेशन आणि नंतर असाध्य आजार, दृष्टी कमी होऊ लागली
    रतन उद्ध्वस्त झाली होती. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती डिप्रेशनमध्ये गेली होती. वडिलांचा मृत्यू तिला स्वीकारता आला नाही. आणि याच काळात तिला असाध्य आजार झाला. रतनला ऑटोइम्यून डिसऑर्डर असल्याचे निदान झाले, ज्यामुळे तिची दृष्टी खराब झाली. तिच्या डोळ्यांवर प्रकाशाचाही परिणाम होऊ लागला.

  • 6/9

    स्टेरॉईड्स घेण्यास नकार दिला, अन्…
    रतनच्या म्हणण्यानुसार, हा एक असाध्य आजार होता आणि त्यावर फक्त स्टेरॉईड्सनेच उपचार करता येऊ शकतो. पण स्टेरॉईड्स घेणार नाही असे रतनने ठरवले होते आणि मग तिने आयुर्वेद आणि होमिओपॅथिक उपचारांची मदत घेतली. आज रतन राजपूत पूर्णपणे ठीक आहे.

  • 7/9

    टेलिव्हिजनवरील स्वयंवर, अभिनवशी तुटले नाते
    रतन राजपूत आज ३७ वर्षांची आहे आणि तरीही ती अविवाहित आहे. तिने नॅशनल टेलिव्हिजनवर एक स्वयंवर आयोजित केला होता, ज्यामध्ये तिने अभिनव शर्माशी लग्न केले.

  • 8/9

    दोघांनीही एकमेकांना डेट केले, पण लग्न होऊ शकले नाही. रतन राजपूत आणि अभिनवचे नाते साखरपुड्यानंतर काही महिन्यांतचं तुटले.

  • 9/9

    आता अध्यात्माच्या मार्गावर
    रतन राजपूत आता अभिनयापासून दूर असून तिने आध्यात्मिक जीवनाला सुरुवात केली आहे. एकदा प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी ती वृंदावनला पोहोचली होती, तेव्हा तिने सांगितले होते की तिला आता अभिनयात रस नाही. ती आता आध्यात्मिक मार्गावर आहे. (सर्व फोटो साभार- रतन राजपूत इन्स्टाग्राम) हेही पाहा-

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress ratan raajputh struggle story marriage broken and illness details spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.