-
‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीच्या जिवलग मैत्रिणीच्या म्हणजेच कुसुमताईच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा दानडे झळकली आहे.
-
दिशा दानडेने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, कुसुम या भूमिकेमुळे अभिनेत्रीला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. मालिकेत कुसुम ‘सिंगल’ असली तरीही खऱ्या आयुष्यात अभिनेत्री दिशा दानडे विवाहित आहे.
-
दिशाचा विवाहसोहळा २०२० मध्ये थाटामाटात पार पडला होता. अभिनेता सुहास लखनशी दिशाने लग्नगाठ बांधली.
-
आज लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त दिशाने नवऱ्यासाठी खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.
-
“पाच वर्षे…लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान” असं कॅप्शन देत दिशाने नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
दिशा आणि सुहासने एकत्र नाटकात काम केलं होतं. याशिवाय सुहासने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. एकांकिका स्पर्धांमध्ये त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
-
दिशाचा पती सुहास काही दिवसांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकला होता. त्याने रवींद्र फाटक यांची भूमिका साकारली होती. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुहासने देखील रोमँटिक पोस्ट शेअर करत आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या गोड अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“पाच वर्षांचं प्रेम, आनंद आणि असंख्य आठवणी…तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण खूपच खास आहे. माझ्याबरोबर कायम अशीच राहा…आय लव्ह यू…” असं सुहासने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
दरम्यान, आज ‘ठरलं तर मग’ मालिकेचे चाहते त्यांच्या लाडक्या कुसुमवर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : दिशा दानडे व सुहास लखन इन्स्टाग्राम )
‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का? लग्नाला पाच वर्षे पूर्ण, शेअर केले खास फोटो
Web Title: Tharla tar mag fame disha danade and her husband suhas lakhan celebrates fifth marriage anniversary sva 00