-
‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमातून लोकप्रिय झालेला विकी कौशल सध्या खूप चर्चेत आहे. (Photo: Indian Express)
-
त्यामागील कारण म्हणजे त्याचा नवा बिग बजेट ‘छावा’ हा चित्रपट. (Still From Trailer)
-
या चित्रपटात तो नॅशनल क्रश रश्मिका मंदानाबरोबर दिसणार आहे. (Still From Trailer)
-
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित हा चित्रपट त्याच्या करिअरमधला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, असा अंदाज चित्रपट समिक्षक वर्तवत आहेत. (Still From Trailer)
-
दरम्यान, उरी, सॅम बहादूर, डंकी अशा अनेक चित्रपटांमधील उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विकी चित्रपटांसाठी किती मानधन घेतो याबद्दल जाणून घेऊयात. (Photo: Vicky Kaushal/Instagram)
-
सॅम बहादुर
माध्यमांतील माहितीनुसार विकीने सॅम बहादुरसाठी १० कोटी रुपये मानधन घेतलं होतं. या चित्रपटात त्याने भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ यांचं पात्र साकारलं होतं. (Photo: Indian Express) -
वाढवले मानधन
मसान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विकीने सॅम बहादूरनंतर त्याचे मानधन २० कोटींवर नेल्याचे काही वेबपोर्टल्सवरील रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. (Photo: Indian Express) -
डंकी
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकीमध्ये विकीने छोटीशी पण महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. रिपोर्टनुसार यासाठी त्याला १२ कोटी रूपये मिळाले होते. (Photo: Indian Express) -
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटासाठी विकीने किती पैसे आकारले हे अद्याप कळू शकलेलं नाही. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. (Still From Trailer)
‘छावा’मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा विकी कौशल चित्रपटांसाठी किती मानधन घेतो?
Vicky Kaushal fee for films : उरी, सॅम बहादूर, डंकी अशा अनेक चित्रपटांमधील उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विकी चित्रपटांसाठी किती मानधन घेतो याबद्दल जाणून घेऊयात.
Web Title: Chhaava movie actor vicky kaushal fee for films sam bahadur dunki spl