• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor pushkar jog shares experience says marathi film industry needs to come together nsp

“मला खूप वाईट अनुभव…”, अभिनेता पुष्कर जोग म्हणाला, “मी स्वत:ला वचन…”

Pushkar Jog: पुष्कर जोग नेमकं काय म्हणाला? घ्या जाणून…

Updated: February 22, 2025 00:46 IST
Follow Us
  • Pushkar Jog
    1/9

    अभिनेता पुष्कर जोग(Pushkar Jog) हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. विविध मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमांतून तो विविध विषयांवर भाष्य करत असतो. अनेकदा त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे तो चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

  • 2/9

    पुष्कर जोगने कांचन अधिकारी यांच्या बातों बातों में या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत बोलताना अभिनेत्याने म्हटले, “बिग बॉसनंतर मी दोन चित्रपट केले, त्यामध्ये मला खूप वाईट अनुभव आला.”

  • 3/9

    “त्यावेळी मी स्वत:ला वचन दिलं की अमुक एखादी व्यक्ती किंवा कलाकार माझ्या सेटवर येऊन माझ्या क्रूला शिव्या देत असेल किंवा वातावरण नकारात्मक करत असेल, तेव्हा मी शूटिंग थांबवेन, नुकसान सहन करेन; पण कोणताही कलाकार माझ्या साऊंड मॅनला शिव्या देऊ शकत नाही.”

  • 4/9

    “कोणताही कलाकार माझ्या मेकअप मॅनचा अनादर करू शकत नाही. कारण माझ्यासाठी माझं क्रू माझं कुटुंब आहे. तुम्ही कितीही मोठे असाल तरी मला फरक पडत नाही.”

  • 5/9

    “मी माझं स्वत:चं काम तयार करतोय. जे लोकं हे करतात, मला तसंही काम देत नाहीत. जे कलाकार आहेत, जे नखरे करतात, ते त्यांच्या कर्माने जाणार आहेत. त्यांनाही माहितेय की मी कोणाबद्दल बोलतोय. तर मला जो अनुभव आला ना तेव्हा मला समजलं की अशा वातावरणात काम होत नाही.”

  • 6/9

    पुढे पुष्कर जोगने म्हटले, “मी एवढे चित्रपट निर्माण केले, पण मला प्रॉफिट कशातही झाले नाही. कदाचित नुकसानच झालं असेल. पण, मी थांबणार नाहीये. कारण मला प्रेम, आदर हे माझ्या मराठी प्रेक्षकांमुळेच मिळाले आहे. गेली १२ वर्षे मी मुंबईत राहतो. मला ते जाणवतंय की अमराठी लोकं महाराष्ट्रात राहतात. आनंदाने राहा, मला त्याची काही समस्या नाही. पण, इथे येऊन आम्हालाच शहाणपणा नका शिकवू.”

  • 7/9

    “मराठी चित्रपट निर्मात्यांना तुम्ही पाण्यात बघता हे मला जाणवलं. एका मराठी माणसाने फिल्म इंडस्ट्री सुरू केली आहे. साऊथ किंवा बॉलीवूडवाल्यांनी केली नाहीये. आता तुम्ही आम्हालाच पाण्यात बघणार असाल तर मी बोलणारच, तो माझा हक्क आहे. मला त्या गोष्टीचा इतका राग आहे.”

  • 8/9

    “प्रामाणिकपणे मी सगळ्यांना सांगतो की, मराठी फिल्म इंडस्ट्रीने एकत्र येण्याची गरज आहे, पण ते होत नाही. कारण लोकांमध्ये खूप अहंकार आहे. मला सांगायला इतकं वाईट वाटतं की, जे मराठी मराठी करतात ना तेच स्वत: जास्त लॉबिंग करतात.”

  • 9/9

    “जर तुम्हाला मराठीचा इतका पुळका आहे, तर तुम्ही का दुसऱ्यांचे चित्रपट पोस्ट करत नाही. निवडक लोकांना पाठिंबा का देता? तुम्ही एका चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला, मग माझ्या चित्रपटाचा का नाही करत? कारण अमुक एखादा व्यक्ती आवडत नाही, त्यामुळे एकी नाहीये.” (सर्व फोटो सौजन्य: पुष्कर जोग इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी अभिनेता
Marathi Actor
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: Marathi actor pushkar jog shares experience says marathi film industry needs to come together nsp

IndianExpress
  • Debate heats up, but apex court always upheld Preamble amendment
  • Constitution Preamble Park in Nagpur: SC upheld Article 370 abrogation so there is one Constitution, says CJI
  • Behind Mazagon Dock’s Lanka deal: Eye on China, Colombo bailout plea
  • Almirahs as ‘walls’, 2 shifts: In Mumbai school, Classes 1-8 students are in one hall since 2022
  • On Nitish turf, Chirag set to sharpen ‘new leadership’ pitch, step up ‘Bahujan outreach’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.