• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • अजित पवार
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress archana nevrekar visits old wada where chhatrapati sambhaji maharaj was kept by aurangzeb hrc

छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ठेवलेलं, त्या ठिकाणाहून मराठी अभिनेत्रीने शेअर केले Photos

मराठी अभिनेत्री अर्चना नेवरेकर हिने संगमेश्वर कसबा येथील फोटो पोस्ट केले आहेत.

Updated: March 24, 2025 09:32 IST
Follow Us
  • sangameshwar kasba where chhatrapati sambhaji maharaj was imprisoned
    1/9

    लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देत आहेत.

  • 2/9

    छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ज्याठिकाणी ठेवण्यात आलं होतं, ते ठिकाण म्हणून जे दाखवण्यात येणाऱ्या ठिकाणाला एका मराठी अभिनेत्रीने भेट दिली आहे. तिने संगमेश्वर कसबा येथील एका वाड्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    ‘कुटुंब’, ‘वहिनीची माया,’ ‘सुना’ येती घरा’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये व मराठी मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्चना नेवरेकर हिने शेअर केलेले फोटो चर्चेत आहेत.

  • 4/9

    “संगमेश्वर कसबा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं…ही वास्तू नेमकी काय आहे? ती वास्तू पाहून मन खिन्न झाले. चांगले नाही वाटले…कदाचित म्हणूनच त्या वास्तूमध्ये खूपच भयाण सत्य लपलेलं आहे..तो वाडा दुःखी दिसतो…,” असं अर्चना म्हणाली.

  • 5/9

    “मी माझ्या मुलाबरोबर अशा बऱ्याच ठिकाणी जात असते जिथे आपला इतिहास, आपली संस्कृती त्याला समजली पाहिजे…”, असं अर्चनाने लिहिलं.

  • 6/9

    पुढे ती म्हणते, “प्रत्येक आई जिजाबाई नाही होऊ शकत. प्रत्येक घरात शिवाजी नाही जन्म घेऊ शकत. पण प्रत्येक घरात जिजाईचे संस्कार आणि हिंदुत्वाविषयी प्रेम प्रत्येक आई देऊच शकते.”

  • 7/9

    “एक चांगला माणूस, चांगला नागरिक आणि चांगला भारतीय घरातूनच घडतो आणि घडवला पाहिजे…त्यासाठी पैशाची नाही तर मनाची तयारी लागते…”, असं अर्चना म्हणाली.

  • 8/9

    “मी माझ्या मुलाला नेहमी एकच गोष्ट शिकवते चांगला माणूस हो आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण छान जग,” असं अर्चनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

  • 9/9

    (फोटो सौजन्य – अर्चना नेवरेकर)

TOPICS
इतिहासHistoryफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Actress archana nevrekar visits old wada where chhatrapati sambhaji maharaj was kept by aurangzeb hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.