-
Zee Natya Gaurav Puraskar 2025: यंदाचा झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५ सोहळा हा खूप अविस्मरणीय असणार आहे.
-
यावर्षी झी नाट्य गौरव पुरस्काराचे २५ वे वर्ष आहे.
-
अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स आणि गाजलेल्या नाटकांमधील प्रवेश हा आकर्षणाचा विषय असणार आहे.
-
रंगभूमीवर धमाकूळ घालणार अभिनेते भरत जाधव यांचे ‘श्रीमंत दामोदर पंत’ प्रेक्षकांना पुन्हा झी नाट्य गौरवच्या मंचावर पाहायला मिळणार आहे.
-
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सध्या गाजत असलेले आणि तिकीटबारीवर हाऊसफुल्लचा बोर्ड लावणार ‘शिकायला गेलो एक’ या नाटकामधील प्रवेश प्रशांत दामले आणि हृषिकेश शेलार सादर करणार आहेत.
-
मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सखी गोखले, सुव्रत जोशी, प्रियदर्शन जाधव, अदिती सारंगधर या आणि अश्या अनेक नामवंत कलावंतांची या सोहळ्याला हजेरी लागणार आहे.
-
या सर्वांच्या उपस्थितीने आणि रसिक प्रेक्षकांच्या साथीने हा सुंदर सोहळा रंगणार आहे.
-
या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे अभिजीत खांडकेकर आणि संकर्षण कऱ्हाडे यांचं सूत्रसंचालन.
-
अनेक गोड सरप्राइझेस या नाट्यगौरवच्यानिमित्ताने रसिकांना पाहायला मिळणार आहेत.
-
तेव्हा एका तिकिटात अनेक प्रयोग पाहण्याची नामीसंधी रसिक प्रेक्षकांना असणार आहे.
-
हा सोहळा ३० मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : काळ्या पश्मिना सिल्क साडीत रुपाली भोसलेने केले फोटोशूट)
Photos: ‘या’ दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५ सोहळा
रंगभूमीवर धमाकूळ घालणार अभिनेते भरत जाधव यांचे ‘श्रीमंत दामोदर पंत’ प्रेक्षकांना पुन्हा झी नाट्य गौरवच्या मंचावर पाहायला मिळणार आहे.
Web Title: Zee natya gaurav puraskar 2025 sohala photos these natak will be performed on stage by marathi actors sdn