-
मराठी आणि हिंदी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांच्या घरी एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. (फोटो – sagarikaghatge/ Instagram)
-
सात वर्षांनी हे जोडपं आई-बाबा झाले असून फतेहसिंह खान असं त्याचं नाव ठेवलं आहे. (फोटो – sagarikaghatge/ Instagram)
-
८ जानेवारी १९८६ रोजी जन्मलेल्या सागरिका घाटगे ही राजघराण्यातील आहे असून कोल्हापूरचे शाहू महाराजांच्या वंशातील ती आहे. तिचे वडील विजयसिंह घाटगे हे कागलच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. सागरिकाची आजी सीता राजे घाटगे ही इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तिसरे यांची कन्या आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (फोटो – sagarikaghatge/ Instagram)
-
सागरिका घाटगे वयाच्या आठव्या वर्षापर्यंत कोल्हापुरात राहिली. नंतर ती मेयो कॉलेज गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजस्थानमधील अजमेर येथे स्थलांतरित झाली. (फोटो – sagarikaghatge/ Instagram)
-
सागरिका घाटगे ही राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू होती. तिचं बॉलिवूडमधील पदार्पणही हॉकीवर आधारित चित्रपटातून झालं होतं. (फोटो – sagarikaghatge/ Instagram)
-
२००७ मध्ये सागरिका घाटगेने शाहरुख खान अभिनीत ‘चक दे! इंडिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने एका हट्टी हॉकी खेळाडूची भूमिका साकारली होती. (फोटो – sagarikaghatge/ Instagram)
-
दोन वर्षांनंतर सागरिका घाटगेने फॉक्समध्ये काम केले. यामध्ये अर्जुन रामपाल, सनी देओल आणि उदिता गोस्वामी यांच्यासह सह-कलाकार होते. (फोटो – sagarikaghatge/ Instagram)
-
तिचे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालले नसले तरी, तिने प्रादेशिक चित्रपटांमध्येही काम केले. (फोटो – sagarikaghatge/ Instagram)
-
२०१२ मध्ये तिने अतुल कुलकर्णी यांच्यासोबत प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले आणि २०१५ मध्ये, तिने दिलदारियां या चित्रपटाद्वारे पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. (फोटो – sagarikaghatge/ Instagram)
अभिनेत्री सागरिका घाटगे कोल्हापूरच्या ‘या’ राजघराण्याशी आहे संबंधित; तर ‘या’ खेळात आहे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू!
Sagarika Ghatge : मराठी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांच्या घरी एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे.
Web Title: Actress sagarika ghatge belongs to a royal family sgk