• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 11 must watch spine chilling horror films and series that redefine terror and fear jshd import rak

तुमच्यात हिंमत असेल तरच पाहा २०२५ मधील ‘हे’ टॉप ११ हॉरर चित्रपट आणि वेब सीरिज

Top Horror Movies and Series : तुम्हााल भयपट पाहायला आवडत असतील तर आपण आज २०२५ मधील ११ टॉप हॉरर चित्रपटांची यादी आपण पाहाणार आहोत.

April 24, 2025 01:52 IST
Follow Us
  • Best horror movies 2025
    1/13

    २०२४-२५ हे वर्ष हॉरर चित्रपट प्रेमींसाठी एका पर्वणीपेक्षा कमी राहिले नाही. या वर्षी, मोठ्या पडद्यापासून ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपर्यंत, असे अनेक भयपटांची पाहायला मिळाले ज्यांनी प्रेक्षकांची झोप उडवून टाकली आहे. क्लासिक रीबूट, सायकॉलॉजिकल थ्रिलर्सपासून ते हाय-टेक डिस्टोपियन कथांपर्यंत – या वर्षीची हॉरर चित्रपटांची यादी खरोखरच थरकाप उडवणारी आहे. (Still From Film)

  • 2/13

    जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना भीतीने थरकाप उडवणारे चित्रपट आवडतात, तर येथे आफम २०२५ मधीस ११ सर्वोत्तम हॉरर चित्रपट आणि वेब सिरीजची यादी पाहाणार आहोत, जी पाहिल्यानंतर तुम्ही घरातील दिवे बंद करताना विचार कराल. (Still From Film)

  • 3/13

    ब्लॅक मिरर – सीझन ७
    नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय अँथॉलॉजी सीरिज ब्लॅक मिररचा सातवा सीझन देखील २०२५ च्या या यादीत समाविष्ट होणार आहे. तंत्रज्ञान आणि मानवांमधील संबंध भयावह पद्धतीने दाखवणारी ही सीरिज पुन्हा एकदा लोकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. (Still From Film)

  • 4/13

    कॅसांड्रा
    कॅसांड्रा या जर्मन सायन्स फिक्शन थ्रिलरमध्ये, १९७० च्या दशकातील एक एआय होम असिस्टंट ‘कॅसांड्रा’ पुन्हा सक्रिय होते. पण हे तंत्रज्ञान खरोखरच मदत करण्यासाठी आहे का, की त्याचा काही दडलेला अजेंडा आहे? याटा उलगडा या चित्रपटात होतो. (Still From Film)

  • 5/13

    कंपेनियन (Companion)
    एक वीकेंड ट्रिप, मित्रांचा सहवास आणि एक गूढ पाहुणा— कंपेनियन हा एक सायन्स फिक्शन थ्रिलर आहे जो हळूहळू भयपटाच रुप घेतो. सस्पेन्स आणि टेन्शनने भरलेला हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. (Still From Film)

  • 6/13

    इट फ्रीड्स (It Feeds)
    एक मानसिक रुग्ण आणि तिची आई एका लहान मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतात जिला असे वाटते की ती एखाद्या अलौकिक शक्तीने ग्रासली आहे. हा चित्रपट पाहताना किती भीती वाटू शकतो हे दाखवण्यासाठी चित्रपटाचे नावच पुरेसे आहे. (Still From Film)

  • 7/13

    खौफ
    खौफ ही भारतीय हॉरर सीरिज दिल्लीतील एका वसतिगृहाची कथा आहे, जिथे एका खोलीत एक धोकादायक रहस्य दडलले असते. नवीन मुलगी मधु त्या खोलीत राहू लागल्यावर, तिच्या आजूबाजूच्या मुली भीतीच्या सावटाखाली जगू लागतात. (Still From Film)

  • 8/13

    नोस्फेराटू (Nosferatu)
    २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला हा गॉथिक हॉरर चित्रपट २०२५ मध्येही चर्चेत आहे. एका घाबरलेल्या तरुणी आणि एका धोकादायक व्हॅम्पायरमध्ये यांच्यात घडणारी कथा या हॉरर चित्रपटातून दिसून येईल. (Still From Film)

  • 9/13

    सिनर्स (Sinners)
    १९३२ मध्ये मिसिसिपी डेल्टाच्या पार्श्वभूमीवर घडनारा हा अमेरिकन हॉरर चित्रपट दोन जुळ्या भावांची कथा सांगतो जे त्यांच्या भूतकाळातून पळून जाऊन नवीन जीवन सुरू करू इच्छितात. पण त्यांच्या गावातील काही धक्कादायक रहस्य उघड होऊ लागतात. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी तुम्हाला पडद्यावर खिळवून ठेवतील. (Still From Film)

  • 10/13

    द लास्ट ऑफ अस – सीझन २
    या सीरिजचा दुसरा सीझन, जोएल आणि एलीची कहाणी पुढे नेणारा असून याची पार्श्वभूमी ही पोस्ट-इपोकॅलिप्टिक दाखवण्यात आली आहे. बुरशीजन्य संसर्गाने त्रस्त असलेले जग आणि लोकांता जगण्यासाठीचा संघर्ष – ही सीरीज भीतीबरोबरच भावनिक गुंता देखील दाखवते.(Still From Film)

  • 11/13

    द श्राउड्स (The Shrouds)
    एक पुरूष आपल्या मृत पत्नीच्या मृतदेहाशी जोडण्यासाठी तंत्रज्ञान तयार करतो . ‘द श्राउड्स’ हा एक बॉडी हॉरर ड्रामा आहे जो मृत्यू आणि तंत्रज्ञान यांच्यातील संबंध अतिशय भयानक पद्धतीने सादर करतो.(Still From Film)

  • 12/13

    द अग्ली स्टेपसिस्टर (The Ugly Stepsister)
    बॉडी हॉरर आणि डार्क फँटसी यांचे मिश्रण—द अग्ली स्टेपसिस्टर हा चित्रपट देखील तुम्हाला रोमांचित करेल. यामध्ये एल्विराचा तिच्या सावत्र बहिणीशी झालेला संघर्ष तुम्हाला ग्रिम फेएरीटेल्स आठवण आणून देईल, यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपात पाहायला मिळेल. (Still From Film)

  • 13/13

    वुल्फ मॅन (Wolf Man)
    जेव्हा एक व्यक्ती त्याची पत्नी आणि मुलीला लांडग्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण हळूहळू तो स्वतः लांडगा बनून जातो तेव्हा काय होते? वुल्फ मॅन हा चित्रपट पारंपारिक वेअरवुल्फ कथांना एका नवीन पद्धतीत सादर करतो. (Still From Film)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: 11 must watch spine chilling horror films and series that redefine terror and fear jshd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.