• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonali kulkarni shares anecdote of first meeting with vidya balan she didnt recognise her praises bollywood actress nsp

विद्या बालन व सोनाली कुलकर्णीची ‘अशी’ झालेली पहिली भेट; अभिनेत्रीने सांगितला किस्सा, म्हणाली, “विद्या खूप…”

Sonali Kulkarni shares Anecdote of Vidya Balan: विद्या बालनने कौतुक केले पण…; सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली?

Updated: May 2, 2025 23:32 IST
Follow Us
  • Sonali Kulkarni
    1/9

    सोनाली कुलकर्णीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने विद्या बालनच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी खूप जाहिरातीत काम केले आहे, त्यासाठी खूप ऑडिशन्स दिल्या आहेत. (फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

  • 2/9

    “१९९७-२००० या काळात ७०-८० जाहिरातीत काम केलं असेल. तेव्हा आम्ही मोबाइलवर टेस्ट करून पाठवायचो नाही. आम्ही ऑडिशन द्यायला जायचो. तर माझं सिलेक्शन व्हायचं आणि मला जाहिरातीत काम मिळायचं. तर एकदा मी सॅमसोनाईटच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी मद्रासला चालले होते.” (फोटो सौजन्य: विद्या बालन)

  • 3/9

    “मी एकटीच होते. एक सुंदर मुलगी तिच्या आई आणि बहिणीबरोबर विमानतळावर बसलेली दिसली होती. विमान मद्रासला उतरलं.” (फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

  • 4/9

    “मागचं दार उघडणार होतं, म्हणून मी पुढून मागे चालले होते; तर विमानतळावर दिसलेली मुलगी मला परत दिसली आणि मला ती म्हणाली की, तुम्ही ‘दोघी’ या सिनेमात होता ना?” (फोटो सौजन्य: विद्या बालन)

  • 5/9

    “मी म्हटलं की हो. तुला मराठी समजतं का? तर ती मला म्हणाली की हो. खूप चांगला चित्रपट आहे. मला तुमचं काम खूप आवडलं. तिचा तो चेहरा माझ्या लक्षात राहिला. मी तिला थँक्यू म्हटलं. तू दिसायला गोड आहेस, असं म्हणाले आणि मी गेले.” (फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

  • 6/9

    “दुसऱ्या दिवशी माझं शूटिंग जिथे होतं, तिथे मला मेकअप रूम शेअर करावी लागणार आहे, तिथे काहीतरी अडचण आहे वगैरे असं सांगितलं गेलं. मी ओके म्हणाले. मी तिथल्या मेकअपरूममध्ये गेले, तर तिथे तीच मुलगी होती.” (फोटो सौजन्य: विद्या बालन)

  • 7/9

    ‘मी तिला विचारलं की तू अभिनेत्री आहेस का? तर ती म्हणाली हो, माझं शूटिंग आहे. मी तिला विचारलं की तुझं नाव काय आहे? तू किती छान दिसतेस. यावर ती मुलगी म्हणाली, विद्या बालन नाव आहे.” (फोटो सौजन्य: विद्या बालन)

  • 8/9

    पुढे सोनाली कुलकर्णी म्हणाली, “विद्याला हे लक्षात आहे. आम्ही अलीकडेच आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या लग्नात भेटलो होतो, त्यावेळी आम्ही गप्पा मारत होतो. विद्या मला म्हणाली की तुला आठवतं का? मी एकदा तुला विमानात कॉम्प्लिमेंट दिलं होतं. (फोटो सौजन्य: विद्या बालन)

  • 9/9

    “मी तिला म्हटलं की मी म्हणायला पाहिजे की तू माझं कौतुक केलं होतंस हे माझ्या लक्षात आहे. विद्या खूप गोड आहे.” (फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sonali kulkarni shares anecdote of first meeting with vidya balan she didnt recognise her praises bollywood actress nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.