-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
मधुराणीने नुकतेच ‘अंजोर’ (Anjor) या ब्रॅण्डसाठी सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराणीने तगर फुलांची एम्ब्रॉयडरी (Tagar Flower Embroidery) असलेली काळ्या रंगाची साडी (Black Saree) नेसली आहे.
-
काळ्या साडीतील लूकवर गॉगल लावून मधुराणीने फोटोशूटसाठी हटके पोज दिली आहे.
-
मधुराणीने या फोटोशूटला खास कॅप्शन दिले आहे, “ना नावात भारदस्त पणा, ना कुठला दैवी सुगंध, ना एखाद्या ऋतू मधे बहरण्याचा नखरा, ना कोणाच्या डोक्यात माळली जाण्याची आस ना तिला कुठलं ठराविक नाव..”.
-
“तगर म्हणा, स्वस्तिक म्हणा, चांदणी म्हणा किंवा चंदिपाट.. सगळ्या नावांना होकार देईल अशी साधी निरागस फुलं! ती फक्त असते.. सोबत असते.. एखाद्या मैत्रिणीसारखी.. अगदी रोज ही फुलं दिसतात म्हणून दुर्लक्षितच आहेत असं वाटतं मला..”
-
“पण कधी जवळून पाहिली आहेत का ही फुलं याच्या कळ्या ? काय देखणा आकार असतो फुलांचा.. गंध नसला म्हणून काय झालं, साधेपणात असणारं सौंदर्य जाणलंय या फुलांनी..”
-
“कधी रात्री पाहिलं आहेत का तगरीचं झाड, गर्द हिरव्या रंगात चांदण्या उमलल्यात जणू..”
-
“म्हणूनच या चांदण्या नेसायचा मोह काही आवरला नाही.. अंजोर नी ही अगदी नवी कोरी साडी तयार केली आहे.. तगरीच्या फुलांची साडी ही कल्पनाच किती छान आहे ना.. जे फूल नेहमी जोबत असूनही दुर्लक्षित आहे त्याला न्याय द्यायला याहून छान पर्याय असूच शकत नाही ! नाही का ?”
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
Photos: तगर फुलांची एम्ब्रॉयडरी असलेल्या काळ्या साडीत मधुराणी गोखलेचे सुंदर फोटोशूट
“तगर म्हणा, स्वस्तिक म्हणा, चांदणी म्हणा किंवा चंदिपाट.. सगळ्या नावांना होकार देईल अशी साधी निरागस फुलं!”
Web Title: Marathi actress madhurani gokhale tagar flower embroidery black saree look phototshoot viral sdn