-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu) मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
पहिल्याच आठवड्यात ६.७ टीआरपी मिळवत मालिकेची धमाकेदार सुरुवात झाली आहे.
-
लवकरच या मालिकेत एक रोमांचक वळण पाहायला मिळणार आहे.
-
कावेरी आणि उदयच्या अपघातानंतर चिमुकल्या चिकूला घेऊन कावेरी धर्माधिकारींच्या घरी येते. मात्र सुलक्षणा तिचा स्वीकार करत नाही.
-
घरात स्थान हवे असेल तर मंदिराजवळ असलेल्या तलावातून कमळ आणण्यासाठी तिला सांगण्यात येते.
-
त्या तलावात उतरणे म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळण्यासमान आहे.
-
कावेरी हे आव्हान स्वीकारते आणि तलावत उतरते. कावेरीचा जीव वाचणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल.
-
अभिनेत्री गिरीजा प्रभूसाठी (Girija Prabhu) हा सीन साकारणे आव्हानात्मक होते. साडी नेसून तलावात उतरणे म्हणजे तारेवरची कसरत.
-
बॉडी डबल न वापरता गिरीजाने हा सीन पूर्ण केला आहे.
-
कुडाळ येथील वालावल मंदिराजवळच्या तलावात हा सीन शूट करण्यात आला आहे.
-
दलदल आणि कमळांचे पसरलेले जाळे यामध्ये शूट करणे जोखमीचे होते.
-
या मालिकेच्या संपूर्ण टीमच्या मदतीने गिरीजाने यशस्वीरित्या हा सीन पूर्ण केला.
-
जवळपास तीन तास या सीनचे शूट सुरु होते. संपूर्ण टीमच्या मेहनतीचं हे फळ आहे असे अभिनेत्री गिरीजा म्हणाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
Photos: ‘दलदल, कमळांचे पसरलेले जाळे’; वालावल मंदिराजवळच्या तलावात ‘असा’ शूट केला कावेरीने सीन
साडी नेसून तलावात उतरणे म्हणजे तारेवरची कसरत. बॉडी डबल न वापरता गिरीजाने हा सीन पूर्ण केला आहे.
Web Title: Actress girija prabhu shared experience of shooting kon hotis tu kaay zaalis tu tv serial episode sdn