-
दमदार अभिनयासाठी मराठी अभिनेत्री छाया कदम (Actress Chhaya Kadam) यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
-
अनेक हिंदी व मराठी चित्रपटांतून (Marathi And Hindi Movies) छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचे दर्शन घडवले आहे.
-
नुकतीच छाया यांनी कान्स चित्रपट महोत्सवाला (2025 Cannes Film Festival) हजेरी लावली होती.
-
या चित्रपट महोत्सावासाठी छाया यांनी क्रिम रंगाची सुंदर साडी (Saree Look) नेसली होती.
-
छाया यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
-
छाया म्हणाल्या, “कान्स चित्रपट महोत्सव आणि साडी हे जणू माझ्यासाठी एक सुंदर असे समीकरणच जुळून येत आहे.”
-
“मागील वर्षी आईची साडी आणि नथ कान्समध्ये मला घेऊन जाता आली याचा प्रचंड आनंद असतानाच यावर्षीच्या कान्सच्या निमित्ताने माझ्या गावच्या जिवाभावाच्या मैत्रिणींनी खूप मायेने मला भेट दिलेली ही साडी फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी मी जणू मोरपिसा सारखी पांघरूणच घेतली.”
-
“मागच्या वर्षी कान्समधून पुन्हा आले तेव्हा अनेक जवळच्या माणसांनी प्रेमाने – आपुलकीने माझा सत्कार केला.”
-
“हा सत्कार माझ्यासाठी खास यासाठी होता की या सगळ्या जणींनी आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्यातून वेळ काढून आजवरचा त्यांनी केलेला पहिला सत्कार होता.”
-
“त्यामुळे माझ्याबरोबरच त्यांनीही तो इतका दिलखुलास साजरा केला की त्यांचा आनंद त्यांच्या मनमुराद नाचण्यात – बागडण्यात आणि धिंगाणा घालण्यात दिसत होता.”
-
“आपली माणसं – त्यांचे प्रेम आणि त्यातून मिळणारी आपलेपणाची ऊब याचे मोल सातासमुद्रा पार देखील अमूल्यच असते.”
-
“गो ! तुम्ही दिलेली साडी नेस्हान. आईची नथ नाकात घालून आणि तिचेच कानातले घालून कान्सच्या समुद्रार लय मिरावलय.”
-
(सर्व फोटो सौजन्य : छाया कदम/इन्स्टाग्राम)
Cannes Film Festival 2025: छाया कदम यांच्या कान्स चित्रपट महोत्सवातील लूकने वेधले सर्वांचे लक्ष
अनेक हिंदी व मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचे दर्शन घडवले आहे.
Web Title: Cannes film festival 2025 marathi actress chhaya kadam saree look seeking attention on social media sdn