• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta subhash opens up on facing casting couch shared several incidents says i felt a hand around my waist nsp

“एक निर्माता वारंवार…”, अमृता सुभाषने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; म्हणाली, “मी वळून पाहिलं…”

Amruta Subhash Opens Up On Facing Casting Couch:अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत काम करीत असताना काही वाईट अनुभव आल्याचा खुलासा केला.

Updated: May 30, 2025 18:36 IST
Follow Us
  • Amruta Subhash
    1/9

    अभिनेत्री अमृता सुभाषने मराठी, हिंदी चित्रपटांसह वेब सीरिजमध्येही काम केले आहे. तिने साकारलेल्या भूमिकांबद्दल प्रेक्षक, समीक्षक, तसेच इतर कलाकारांकडून तिचे वेळोवेळी कौतुकही झाले आहे.

  • 2/9

    आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीत काम करीत असताना तिला काही वाईट अनुभव आल्याचे सांगितले आहे. कास्टिंग काऊचबाबत वक्तव्य केले आहे.

  • 3/9

    अमृताने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “मला आठवतं- मी एक नाटक करीत होते. त्या नाटकाच्या निर्मात्यानं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला होता. मी पायऱ्या चढत होते. त्यावेळी मला माझा टॉप थोडा वर गेल्यासारखा वाटला. त्यानंतर माझ्या कंबरेभोवती कोणीतरी हात घातल्याचं जाणवलं.”

  • 4/9

    “मी वळून पाहिलं आणि त्या निर्मात्याला विचारलं की, तू हे काय करतोयस. त्यानं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण, मी त्याला म्हणाले की, तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करण्याची? तू हे करू शकत नाहीस. माझं ते बोलणं ऐकूण तिथे असणाऱ्यांना असं वाटलं की, आता हिला भूमिका मिळणार नाही.”

  • 5/9

    आणखी एका प्रसंगाची आठवण सांगत अमृता म्हणाली, “मी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिक्षण घेत होते. एकदा मी दिल्लीहून पुण्याला परत येत होते. त्या प्रवासात मी एका लहान मुलाबरोबर कार्ड खेळत होते. जेव्हा मी झोपले, तेव्हा मला माझ्या शरीरावर एक हात जाणवला. मी तो हात धरला.”

  • 6/9

    “जेव्हा मी उठून पाहिलं, तर तो तोच मुलगा होता. जेव्हा मी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो तोंड धुण्यासाठी बेसिनकडे पळाला. त्यानं रडण्यास सुरुवात केली. तो लहान होता, त्यामुळे मी त्याच्यावर ओरडले नाही, त्याला समजावून सांगितले.”

  • 7/9

    एका निर्मात्याने अमृताला दारू पिण्यासाठी वारंवार विचारल्याची आठवण सांगत अभिनेत्री म्हणाली, “एक निर्माता वारंवार मला दारू पिण्यासाठी आणि जेवणासाठी आग्रह करीत होता. एक दिवस मी त्याच्या खोलीमध्ये गेले.”

  • 8/9

    “खोलीचा दरवाजा उघडा ठेवला आणि त्याला म्हणाले की, सर, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे का बोलत आहात? मी त्याच्या डोळ्यांत बघत राहिले. त्यानंतर तो अवघडल्यासारखं वागू लागला.”

  • 9/9

    अमृताने असाही खुलासा केला की, तिने अनेक निर्मात्यांबरोबर शय्यासोबतीस नकार दिला. त्यामुळे तिला काम मिळाले नाही. अमृता म्हणाली, “मला अनेक भूमिका गमवाव्या लागल्या; पण मी कधीही तडजोड केली नाही.” (सर्व फोटो सौजन्य: अमृता सुभाष इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमराठी सिनेमाMarathi Cinema

Web Title: Marathi actress amruta subhash opens up on facing casting couch shared several incidents says i felt a hand around my waist nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.