Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. elvish yadav to bharti singh per episode salary of laughter chefs 2 cast will shock you jshd import pdb

‘लाफ्टर शेफ्स’च्या सेटवर पैशांचा पाऊस! एल्विश, भारती की कृष्णा, कोण घेतो सर्वाधिक मानधन? कलाकारांची कमाई ऐकून थक्क व्हाल!

‘लाफ्टर शेफ्स 2’मध्ये फक्त हसू नाही, ‘पैशांचा खेळ’ पण! कोण घेतो सर्वाधिक पैसे? एल्विश यादव ते भारती सिंहपर्यंत कोण किती घेतं, जाणून घ्या..

Updated: May 30, 2025 19:15 IST
Follow Us
  • Laughter Chefs 2
    1/9

    हिंदी टेलिव्हिजनवर सध्या ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ हा रिअ‍ॅलिटी शो चांगलाच गाजत आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढत आहे. या शोमध्ये सेलेब्रिटींच्या धमाल मस्तीने, अनोख्या कुकिंग चॅलेंज्सनी आणि त्यांच्या गोड भांडणांनी लोकांच्या हृदयात जागा मिळवली आहे. पण कधी विचार केलात का की या मजेदार शोतील तुमचे आवडते कलाकार एका एपिसोडसाठी किती कमाई करतात? डीएनएच्या अहवालानुसार, लाफ्टर शेफ्स सीझन २ मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांबद्दल जाणून घेऊया. (छायाचित्र स्रोत: @colorstv/instagram)

  • 2/9

    कृष्णा अभिषेक
    कॉमेडीच्या दुनियेतला अव्वल कलाकार कृष्णा अभिषेक शोमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. त्याच्या एनर्जी, टाइमिंग आणि व्यक्तिमत्त्वामुळे तो प्रेक्षकांचा लाडका ठरतो. कृष्णा एका एपिसोडसाठी जवळपास १० ते १२ लाख रुपये मानधन घेतो. (फोटो स्रोत: @colorstv/instagram)

  • 3/9

    भारती सिंह
    भारती सिंह ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय महिला कॉमेडियनपैकी एक आहे. तीही कृष्णाच्या बरोबरीने एका एपिसोडसाठी १० ते १२ लाख रुपये मानधन घेते.(फोटो स्रोत: @colorstv/instagram)

  • 4/9

    अंकिता लोखंडे
    टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत या शोमध्ये धमाल करताना दिसते. अंकिता एका भागासाठी ३ लाख रुपये मानधन घेत आहे.(फोटो स्रोत: @colorstv/instagram)

  • 5/9

    एल्विश यादव
    यूट्यूब स्टार आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव देखील या शोमध्ये चमकत आहे. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या एल्विशला एका एपिसोडसाठी २ लाख रुपये मिळतात. (फोटो स्रोत: @colorstv/instagram)

  • 6/9

    रुबिना दिलैक
    आपल्या शांत आणि ठाम स्वभावासाठी ओळखली जाणारी रुबीना देखील प्रत्येक भागासाठी २ लाख रुपये मानधन घेते. (फोटो स्रोत: @colorstv/instagram)

  • 7/9

    करण कुंद्रा
    टीव्ही अभिनेता करण कुंद्रा देखील शोमध्ये आपल्या स्टाईलने लक्ष वेधून घेतो. करण प्रत्येक एपिसोडसाठी २ लाख रुपये कमावतो. (फोटो स्रोत: @colorstv/instagram)

  • 8/9

    अली गोनी
    प्रेक्षकांमध्ये सहज मिसळणारा आणि गोड स्वभाव असलेला अली गोनी प्रत्येक भागासाठी १.५ लाख रुपये घेतो. (फोटो स्रोत: @colorstv/instagram)

  • 9/9

    विकी जैन
    तसेच अंकिता लोखंडेचा पती विकी जैनला एका एपिसोडसाठी १.२ लाख रुपये मिळतात. (फोटो स्रोत: @colorstv/instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Elvish yadav to bharti singh per episode salary of laughter chefs 2 cast will shock you jshd import pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.