Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pilot aditi paranjpe who felicitate padma shri ashok saraf in airplane read about her journey and family sva

भर विमानात पद्मश्री अशोक सराफांना अभिवादन करणाऱ्या अदिती परांजपे आहेत तरी कोण? निवेदिता यांच्याशी आहे खास नातं…

पद्मश्री अशोक सराफांसाठी विमानात उद्घोषणा करणाऱ्या अदिती परांजपे कोण आहेत? पाहा फॅमिली फोटो…

Updated: May 31, 2025 16:00 IST
Follow Us
  • pilot aditi paranjpe who felicitate padma shri ashok saraf
    1/9

    पद्मश्री अशोक सराफ यांच्यासाठी खास उद्घोषणा करून त्यांना भर विमानात अभिवादन केल्यामुळे सध्या फ्लाइट कॅप्टन अदिती परांपजेंवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

  • 2/9

    अदिती परांजपे या निवेदिता सराफ यांच्या भाची आहेत.

  • 3/9

    अदितींची आई व निवेदिता सराफ यांच्या मोठ्या बहिणीचं नाव डॉ. मीनल परांजपे असं आहे.

  • 4/9

    अदिती यांचे वडील डॉ. सुनील परांजपे सर्जन आहेत आणि आई डॉ. मीनल परांजपे यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्या इंग्रजी शिकवतात. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या भारतात होणाऱ्या परीक्षांच्या त्या परीक्षक आहेत.

  • 5/9

    अदिती यांनी इयत्ता चौथीत असतानाच वैमानिक व्हायचं असं ठरवलं होतं. काहीही झालं तरी करिअर याच क्षेत्रात करायचं यावर अदिती ठाम होत्या. दुसरा कोणताच बॅकअप प्लॅन नव्हता. वैमानिक व्हायचंय असं आई-बाबांना देखील त्यांनी आधीच सांगितलं होतं.

  • 6/9

    अदिती यांनी मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून विज्ञान शाखेत बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ‘इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अ‍ॅण्ड एव्हिएशन सेफ्टी’मधून बी.एस्सी. एव्हिएशन कोर्स पूर्ण केला.

  • 7/9

    वैमानिक बनण्यासाठी मेडिकल फिटनेस ही दुसरी महत्त्वाची अट असते.

  • 8/9

    गोव्याला कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरमध्ये अदिती पहिल्यांदा बसल्या, तेव्हाच एक दिवस विमान नक्की उडवणार हे त्यांनी मनात पक्कं ठरवलं होतं.

  • 9/9

    अवकाशात गगनभरारी घेण्याचं स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगणाऱ्या आणि ते पूर्णत्त्वास नेणाऱ्या फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे आज अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान आहेत. ( फोटो सौजन्य : अदिती परांजपे इन्स्टाग्राम )

TOPICS
अशोक सराफAshok SarafमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Pilot aditi paranjpe who felicitate padma shri ashok saraf in airplane read about her journey and family sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.