-
हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने ४ जूनला बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालशी लग्न केलं.
-
हिना खान व रॉकी जैस्वाल जवळपास १३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांची पहिली भेट २०१२ मध्ये झाली होती.
-
हिना गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे. तिला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाचं ( ब्रेस्ट कॅन्सर ) निदान झालं होतं. या कठीण काळात अभिनेत्रीला कुटुंबीयांसह तिच्या बॉयफ्रेंडने खंबीरपणे साथ दिली.
-
हिना व रॉकीने नोंदणी विवाह केला आहे. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
हिनाने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये तिने अक्षराची भूमिका साकारली होती. हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी त्यावेळी या मालिकेचा सहाय्यक दिग्दर्शक होता. दोघांची यादरम्यानच भेट झाली आणि पुढे त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.
-
रॉकीने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांची निर्मिती केली आहे. २०१६ मध्ये हिना व रॉकी यांनी हिरोज फॉर बेटर फिल्म्स हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं होतं. या अंतर्गत ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’, ‘लाईन्स’, ‘विशलिस्ट’, ‘डोअरमन’ अशा सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
-
रॉकी हा रॉकबाइट या अॅपचा संस्थापक सुद्धा आहे. यासह तो हिना खानसह कॅच क्लोथिंग ब्रँडचा सहमालक देखील आहे.
-
रॉकी दरवर्षी ६०-७० लाख रुपये कमावतो आणि त्याची एकूण संपत्ती ६-७ कोटी एवढी असल्याचं स्टार्स अनफोल्डेडच्या अहवालात म्हटलं आहे.
-
दरम्यान, हिना खानने लग्नसोहळ्यात खास लूक केला होता. तिने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेसली होती. या साडीच्या पदावर हिना व रॉकीचं नाव लिहून सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : हिना खान इन्स्टाग्राम, knottingbells, iq.weddings )
१३ वर्षांचं प्रेम ते कॅन्सरग्रस्त हिना खानला खंबीर साथ! अभिनेत्रीचा पती रॉकी जैस्वाल काय काम करतो? नेटवर्थ आहे तब्बल…
कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचा पती रॉकी जैस्वाल काय काम करतो? त्याची नेटवर्थ किती आहे…
Web Title: Who is rocky jaiswal hina khan long time boyfriend and now husband know his net worth and business sva 00