-
रितेश व जिनिलीया देशमुख यांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.
-
वैयक्तिक आयुष्यात, रितेश-जिनिलीया शाकाहारी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘इमॅजिन मीट्स’ हा प्लान्ट बेस्ड खाद्यपदार्थांचा ब्रँड सुरू करून स्वत:च्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
-
रितेश देशमुख चहा-कॉफीचं सेवन देखील करत नाही.
-
रितेश व जिनिलीयाने एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आवडत्या पदार्थांचा खुलासा केला होता.
-
या दोघांना “कॉफी की चहा? तुम्हाला काय आवडतं?” हा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
यावर जिनिलीयाने कॉफी असं उत्तर दिलं होतं आणि रितेश चहा-कॉपी पीत नाही, असं अभिनेत्रीने सांगितलं होतं.
-
चहा-कॉफीऐवजी रितेश देशमुख ग्रीन टी पितो.
-
याशिवाय देशमुख कुटुंबीयांचा आवडता पदार्थ कोणता? हा प्रश्न विचारल्यावर या दोघांनी ‘वडापाव विथ ठेचा’ असं उत्तर दिलं.
-
वडापाव खायचा मला कधीच कंटाळा येणार नाही असंही रितेशने सांगितलं होतं. ( सर्व फोटो सौजन्य : रितेश व जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम )
ना चहा, ना कॉफी…; पत्नी जिनिलीयाने सांगितली रितेशची आवड, देशमुख कुटुंबीयांचा आवडता पदार्थ कोणता?
रितेश देशमुख चहा-कॉफी पीत नाही…; जिनिलीयाने सांगितली नवऱ्याची आवड, म्हणाली…
Web Title: Riteish deshmukh never drinks coffee or chai reveals his favourite drink and family favourite dish sva 00