-
विनोदी कलाकार आणि अभिनेता जॉनी लिवरप्रमाणेच, त्यांची मुलगी जेमी लिवर देखील एक उत्तम कलाकार आहे. तिच्या वडिलांप्रमाणेच, ती देखील चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका करते आणि त्यात तिला खूप आवड आहे. सध्या ती तिच्या चित्रपटामुळे किंवा विनोदामुळे नाही तर तिच्या बालपणीच्या एका भयानक घटनेमुळे चर्चेत आहे, ज्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. तिच्या शाळेतील दिवसांची आठवण सांगताना तिने सांगितले की एकदा एका पुरूषाने तिच्यासमोर घृणास्पद कृत्य केले होते त्यानंतर ती खूप घाबरली आणि वर्षानुवर्षे कोणत्याचं पुरूषाच्या जवळ गेली नाही किंवा कोणालाही तिच्या जवळ येऊ दिले नाही. (Photo- Jamie Lever/Instagram)
-
खरंतर, जेमीने अलीकडेच हॉटरफ्लायशी संवाद साधला. या संवादात तिने तिच्या शाळेतील दिवसांची एक धक्कादाय घटना शेअर केली आणि सांगितले की जेव्हा ती १०-१२ वर्षांची होती तेव्हा एका पुरूषाने तिच्यासमोर एक घृणास्पद कृत्य केले. या घटनेचा जेमीवर खूप परिणाम झाला. (Photo- Jamie Lever/Instagram)
-
जेमीने सांगितले की, जेव्हा ती शाळेतून परतत होती, तेव्हा ती बाहेर तिच्या भावाची वाट पाहत होती. त्याच दरम्यान, एक माणूस आला आणि तिच्या आणि तिच्या मित्राच्या अगदी समोर उभा राहिला. तो तिथे आला आणि त्यांच्यासमोर हस्तमैथुन करू लागला. हे पाहून तिला धक्का बसला. (Photo- Jamie Lever/Instagram)
-
जेमी म्हणाली की तिने पहिल्यांदाच असं कृत्य पाहिले होते आणि तो काय करत आहे याची तिला काहीच कल्पना नव्हती. तिच्या मैत्रिणीने तिला त्या माणसापासून दूर जाण्याचा सल्ला दिला आणि ते तिथून निघून गेले व आपसात बोलू लागले. या घटनेने अभिनेत्री खूप घाबरली. (Photo- Jamie Lever/Instagram)
-
जॉनी लिवरच्या मुलीने पुढे सांगितले की ती थरथर कापत होती आणि तिने हळू हळू गाडी लॉक केली. काही वेळाने, त्या व्यक्तीला वाटले की ती त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, म्हणून तो स्वतः तिथून निघून गेला. जेमी म्हणते की त्यावेळी ती १० किंवा १२ वर्षांची असेल. (Photo- Jamie Lever/Instagram)
-
एवढेच नाही तर, जेमीने तिच्या शाळेतील आणखी एका वाईट अनुभव शेअक केला आणि सांगितले की एक बस कंडक्टर तिला आणि तिच्या मैत्रिणींना स्पर्श करायचा. तिने सांगितले की तो कधीकधी त्यांना स्पर्श करायचा आणि कधीकधी त्यांना पकडायचाही. (Photo- Jamie Lever/Instagram)
-
जेमीला कॉलेजमध्येही अशा वाईट घटनांचा सामना करावा लागला आहे. ती म्हणते की कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर तिच्यासोबत वाईट अनुभव देणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. एकदा ती अंधेरी स्टेशनवर होती तेव्हा एक माणूस तिथे आला आणि तिच्यासमोर विकृत चाळे करायला लागला. (Photo- Jamie Lever/Instagram)
-
जेमी या घटनांना खूप वाईट म्हणून पाहते. तिला तिच्या आयुष्यात पुन्हा अशा गोष्टींना सामोरे जायचे नाही असे ती म्हणाली. ती म्हणते की या भयानक घटनांमुळे तिने वर्षानुवर्षे कोणत्याही पुरुषाला तिच्या जवळ येऊ दिले नाही. (Photo- Jamie Lever/Instagram)
-
जेमीने सांगितले की, या घटनांचा तिच्यावर एवढा परिणाम झाला होता की तिने मुलांशी खूप उशिरा बोलायला सुरुवात केली. जेव्हा ती पदव्युत्तर शिक्षणासाठी लंडनला गेली तेव्हा ती मुलांशी मोकळेपणाने बोलू शकली आणि त्या भयानक घटनांमधून सावरली. (Photo- Jamie Lever/Instagram) हेही पाहा- Photos: ‘फुले’ फेम अक्षया गुरवचा पारंपरिक लूक; साडीमध्ये दिसतेय खूपच सुंदर…
“मी थरथर कापत होते…”; १२ व्या वर्षी जेमी लिवर आला होता घृणास्पद अनुभव, वाईट घटनांवर बोलताना म्हणाली…
Jamie Lever Childhood Trauma: जॉनी लीव्हरची मुलगी जेमी तिच्या वडिलांप्रमाणेच एक उत्तम विनोदी कलाकार आहे. ती एक अभिनेत्री देखील आहे. अलीकडेच तिने तिच्या बालपणातील एका भयानक धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे…
Web Title: A man masturbated in front of johnny lever daughter jamie lever childhood trauma horrific incident bus conductor aslo molested her spl