Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress madhurani gokhale anjor photoshoot purple cotton saree aboli flower embroidery sdn

Photos: जांभळी साडी, अबोलीच्या फुलांची एम्ब्रॉयडरी; पाहा मधुराणी गोखलेचं सुंदर फोटोशूट

“केवळ तीन पाकळ्या पण काय तो नाजूक पणा.. अबोलीचा देठ सुद्धा किती निरागस वाटतो ना.. अगदी फुलाला शोभेल असा..”

Updated: June 23, 2025 11:44 IST
Follow Us
  • Madhurani Gokhale Purple Saree Look
    1/11

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी गोखले (Actress Madhurani Gokhale) सध्या चर्चेत आहे.

  • 2/11

    मधुराणीने नुकतेच इन्स्टाग्रामवरील ‘अंजोर’ (Anjor) या ब्रॅण्डसाठी सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 3/11

    या फोटोशूटसाठी मधुराणीने जांभळ्या रंगाची कॉटन साडी (Purple Cotton Saree Look) नेसली आहे.

  • 4/11

    मधुराणीने नेसलेल्या कॉटन साडीवर अबोलीच्या फुलांची एम्ब्रॉयडरी (Aboli Flower Embroidery) करण्यात आली आहे.

  • 5/11

    या साडीतील फोटोशूटला मधुराणीने खास कॅप्शन दिले आहे.. “गजरा माळला आहे का कधी अबोलीचा? अगदी क्वचित बघायला मिळतो ते सुद्धा मंडई मधे जायचा योग आला तर ! मोगरा आणि अबोली असे दोनही गजरे ठेवले समोर तर माझा हात आधी त्या केशरट अबोली रंगाकडेच जाईल..”

  • 6/11

    “केवळ तीन पाकळ्या पण काय तो नाजूक पणा.. अबोलीचा देठ सुद्धा किती निरागस वाटतो ना.. अगदी फुलाला शोभेल असा.. नाजूक.. अबोलीच्या बिया लावल्या तर हमखास रोप येते फुलं येतात, अगदी भरभरून.. त्यात तिला नाही सुगंध.. दिसायला पण अगदी नाजुक साजुक पण म्हणून फारच आपण तिला फुलांच्या यादीत मागे पाडलं का?”

  • 7/11

    “एखादी मैत्रीण असते ना; कमी बोलणारी, शांत अगदी तिचं तिचं काम चोख करणारी, आपल्याकडे कोणाचं लक्ष आहे नाही याचा तिला काहीही ठाव नसतो.. ती तिचा आनंद मिळवत असावी कदाचित.. अबोल राहून.. तशीच ही अबोली!”

  • 8/11

    “अबोल असण्यात सुद्धा खूप शक्ती असावी पण बहुदा.. लक्ष वेधून घेतेच ही अबोली.. अबोल असूनही कधी बोलते अबोली.. तिच्या रंगांनी.. तिच्या इवल्याश्या पाकळ्यांनी..”

  • 9/11

    “परत एकदा अंजोरने असं फुल निवडलं आहे जे प्रेम मिळवण्यासाठी अगदी आपली वाट बघतय.. माझीही दखल घ्या असं आवर्जून आपल्याला सांगतय !”

  • 10/11

    (सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)

  • 11/11

    (हेही पाहा : पिवळ्या साडीत प्राजक्ता गायकवाडचे फोटोशूट; आरी वर्क ब्लाऊजने वेधले लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress madhurani gokhale anjor photoshoot purple cotton saree aboli flower embroidery sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.