-

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या अभिनेत्री ईशा गुप्ता आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्या डेटिंगच्या बातम्या बी-टाउनमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत, एकेकाळी या दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा होती. पण, दोघांनीही यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. आता बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्री ईशा गुप्ताने डेटिंगच्या बातम्यांबद्दलचे सत्य सांगितले आहे.
-
एका मुलाखतीत, ईशा गुप्ता म्हणाली, ‘हो, आम्ही काही काळ एकमेकांशी बोलत होतो. मला वाटत नाही की आम्ही डेटिंग करत होतो. पण हो, आम्ही काही महिने बोलत होतो. आम्ही ‘कदाचित डेटिंग करू किंवा कदाचित नाही’ अशा टप्प्यात होतो.
-
हार्दिक पंड्या डेटिंगबद्दल ईशा गुप्ता यांचा खुलासा : आम्ही डेटिंगच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच ते संपले. म्हणजे ते डेटिंग नव्हते. आम्ही एक-दोनदा भेटलो, एवढेच. हो, मी म्हटल्याप्रमाणे, काही महिने झाले आणि नंतर ते संपले. ‘ २०१८ मध्ये ईशा गुप्ताचे नाव हार्दिक पंड्याशी जोडले गेले आणि दोघांमध्ये अफेअरची चर्चा होती.
-
दोघेही एक जोडपं म्हणून एकत्र येऊ शकले असते का? असं विचारल्यावर ईशा गुप्ता म्हणाली, “कदाचित ते घडलं असतंही. पण मला वाटत नाही की ते घडायला पाहिजे होतं. कारण त्या बिचाऱ्यांना लाईव्ह टीव्हीवर काही गोष्टी बोलल्याने टीकेचा सामना करावा लागत होता. त्याआधीच आम्ही एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं.”
-
ईशा गुप्ता चित्रपट:, ईशा गुप्ता शेवटची बॉबी देओलच्या ‘आश्रम’ वेब सिरीजमध्ये दिसली होती. याशिवाय ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. यादरम्यान, ती काही म्युझिक व्हिडिओंमध्ये नक्कीच दिसली आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, ती अजय देवगणसोबत ‘धमाल ४’ मध्ये दिसू शकते.
“…अन् ते नातं संपलं”, हार्दिक पंड्याला डेट करण्याच्या चर्चांबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Esha Gupta Hardik Pandya : बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या अभिनेत्री ईशा गुप्ता आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांच्या डेटिंगच्या बातम्या बी-टाउनमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
Web Title: Esha gupta reacts on dating hardik pandya it ended after talking stage hrc