-
बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आली आहे.
-
तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ‘सर्पेंन्टाइन पार्टी’मध्ये सहभागी होताना दिसत आहे.
-
या पार्टीसाठी सोनमने एक अप्रतिम आणि हटके आऊटफिट निवडला होता.
-
फिक्या पिवळ्या रंगाचा एक स्टायलिश लांब कोट आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाचा एक भव्य, आकर्षक स्कार्फ तिने परिधान केला होता.
-
सोनमने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “या आऊटफिटमुळे मला जिवंत, जागृत आणि मी जिथे असायला हवे तिथे असल्यासारखे वाटले.
-
तिचे केस स्लीक बनमध्ये बांधलेले आहेत, ज्यामुळे तिचा चेहरा आणि आऊटफिट अधिक उठून दिसत आहे.
-
सोनम कपूर नेहमीच तिच्या स्टायलिश निवडींसाठी ओळखली जाते आणि यावेळीही तिने तेच सिद्ध केले आहे.
-
(सर्व फोटो : सोनम कपूर/ इन्स्टाग्राम)
Photos: सोनम कपूरचा ‘सर्पेंटाइन पार्टी’ मधील लूक व्हायरल!
सोनम कपूर पुन्हा एकदा तिच्या हटके स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. ‘सर्पेन्टाइन आफ्टर-पार्टी’साठी तिने फिक्या पिवळ्या कोटसह काळ्या भव्य स्कार्फमध्ये क्लासी अंदाज साकारला. स्लीक बन हेअरस्टाईल आणि आत्मविश्वासपूर्ण पोझेसमुळे तिचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Web Title: Bollywood actress sonam kapoor party look yellow coat black scarf svk 05